Monday, July 6, 2020

जालिहाळ बुद्रुकची स्मार्ट व्हिलेजच्या दिशेने वाटचाल

ग्रामविकासाच्या अनेकजण गप्पा मारतात, सरकारी पातळीवर तर रामराज्यापासून स्मार्ट व्हिलेजपर्यत अनेक घोषणा झाल्या पण देशातील व महाराष्ट्रातील खेडी सुधारणांपासून, विकासापासून कोसो मैल दूर राहिली, स्थलांतर होत राहिली. शहरात गर्दी वाढली. ना ग्रामविकास ना शैक्षणिक सुधारणा, ना शेतीला पाणी, ना हाताला काम. पूर्वजन्मीचं पाप म्हणून कायमस्वरूपी दुष्काळी भागात जन्माला यायचं आणि दुष्काळी पट्ट्यातच विकासापासून वंचित आयुष्य कसं बसं ओढायचं असं निराश, हताश जीवन जगणाऱ्या जनतेला एक आशेचा दीप गवसलाय येरळा प्रोजेक्ट सोसायटी आणि जालिहाल पॅटर्न.

१९७२ च्या दुष्काळात लोकांना मदत करावी म्हणून प्रा. वसंतराव, उर्फ व्ही. एन. देशपांडेभीमराव तात्या पाटील या मंडळीनी येरळा सोसायटीची स्थापना केली. ही संस्था यावर्षी ४५ वर्षे पूर्ण करत आहे. संस्थेचा स्थापना दिवस (येरळा डे) यंदा लॉकडावूनचे सारे नियम पाळून साजरा करण्यासाठी व जालिहाळसारख्या दुष्काळी भागात विकासाची पायवाट शोधली आहे. ही वाट ग्रामविकासासाठी, दुष्काळ निर्मूलनासाठी पवदर्शी ठरत आहे याची प्रचिती आली.
१९७२ च्या दुष्काळात कमळापूर रामापूर या गावात दूध संकलन, गरिबांना गृहबांधणी, शेती सुधारणा, असे काम करत सुमारे बाराशे घरे बांधली नव्हे बाराशे कुटुंबे उभी केली व २१ वर्षापूर्वी जालिहाल ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन जालिहाळ व परिसराचा विकास हाती घेतला. अल्पवयीन मुलींची लग्ने, विधवा समस्या, उसतोडणी मजूर म्हणून उस पट्यात रोजगारासाठी हंगामी स्थलांतर, पडिक शेती, पाण्याचे दुर्मिक्ष्य, शिक्षण सुविधा नाही. अंधश्रध्दा. दारिद्रय असे अनेक प्रश्न तीव्र होते आजही ते सारे संपलेले नाहीत पण परिवर्तन होऊ शकते असा आता विश्वास निर्माण झालाय. सेवा, मार्गदर्शन, मदत, दिशा, जागृती कृती, सातत्य आणि पारदर्शी सेवा यातून येरळाचे जालिहाळ मॉडेल तयार झाले आहे.
स्थानिक मंडळी, रेडिओ केंद्रचालवतात हे केंद्र संपर्क, प्रबोधन आणि माहिती केंद्र बनले आहे. हे रेडिओ केंद्र देशातले या क्षेत्रातील अचल व आगळे म्हणून गौरवले गेले आहे. सोसायटीने लहानलहान सिंचन योजना करुन उसतोडीला बाहेर जाणाऱ्या मजुरांना शेती करायला प्रवृत्त केले. शेळीपालन, कुक्कुटपालन. वृक्ष संगोपन, फलबाग विकास असे प्रयोग केले. सोसायटीने नर्सरी केली. शेततळे उमारले. द्राक्ष व गजाली असे मिश्रपिक विकसित केले. शेळीचा नवा संकर आणला. जालिहाळमध्ये पहिली डिजिटल शाळा उभारली, संगणक लैंब. क्युरॅसिटी सेंटर अनेक प्रयोग यशस्वी
केले. विधवा पुर्नविवाह, अपंगांना व विधवांना निवारा असे समाजाला आत्मनिर्मर करणारे अनेक उपक्रम यशस्वी केले. त्यातून जालिहाळ हा विकासाचा नवा पॅटर्न तयार झाला आहे. जालिहाळचे हे काम सुरु असताना चांदोली व शाहूवाडी परिसरातील दुर्गम वस्तीवर पिण्याच्या पाण्याची, सौरऊर्जा वगैरे व्याप सुरुच आहेत, जालिहाल मध्येही सौरकंदील संस्थेच्या माध्यमातून साकारलेले काम पाहण्यासाठी मी आणि जेष्ठ पत्रकार वसंतराव आपटे यांनी नुकताच प्रवास केला लोकांना भेटलो. शेतावर चकरामारल्या. शेतीतले प्रयोग बघितले, शाळेला भेट दिली, विज्ञान जिज्ञासा केंद्र बघितले, येरळावाणी या संस्थेच्या रेडिओ केंद्राची पाहणी केली. जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा बघितली आणि चाट पडलो. जालिहाळ बदलतयं, सुधारतयं, दुष्काळावर मात करत या माणसांनी आपल्या प्रगतीची साधली आहे. लोकांनी घराभोवती देवराई केली आहे. आंबा, नारळ, पेरू, विक्कू, अंजीर, वड, पिंपळ, लिंब अशी अनेक झाडे जगवली. गेल्यावर्षी एक हजार जणांना दोनशे झाडे घराच्या सभोवती जगवायची या अटीवर झाडे, सिंटेक्स टाकी व पाईप दिली गेली.उन्हाळ्यात एक टैंकर शेतकऱ्याचा एक टैंकर सोसायटीचा असे करत सारी झाडे जगवली व यंदा नव्याने वृक्ष लागवडीचा हा देवराई प्रकल्प नव्या एक हजार शेतकयांसाठी सुरु केला. याचे उदघाटन आम्ही केले.झाडे जगवली त्या शेतकऱ्यांना गौरबले. जालिहाल परिसर हिरवाईने नटतो आहे. महाराष्ट्र -कर्नाटक चर्चेतून या परिसराला कृष्णेचे दोन टिएमसी पाणी तुबची बोबलाद
प्रकल्पातून उपलब्य होते आहे. जालिहाळ शालेतून मुले. मुली दहावी बारावी होऊन इंजिनिअर डॉक्टर व्हायला लागलेत. बाल विवाह थांबलेत, उस तोडणी मजूर गावात, शेतात विकासाची पावले टाकताना दिसत आहेत, ड्रॅगनची शेती फायदेशीर ठरते आहे. उन्नती चा. प्रगतीचा नवा विश्वास जागतो आहे.

येरळा पॅटर्नचा आदर्श घेण्यासारखा...
येरळा प्रोजेक्ट सोसायटीचा हेतू ग्रामविकास आणि माणसांना विकासक्षम. सक्षम बनवणं हा आहे. येरळाचे एन. व्ही. तथा नारायण देशपांडे, प्रा सप्तसागर, अध्यक्ष नामदेव पाटील, सौ अपर्णा कुंटे, मिलिंद कुलकर्णी, अरुण खंडागळे व टिम त्यासाठी घडपडते आहे. येरळा अनेक अनि आपला वर्धापन दिन साजरा करते आहे. एड्स निर्मूलनापासून, शाश्वत विकासापर्यत आणि ग्राम सुधारणेपासून, कौशल्य विकास, विद्यार्थी विकासापर्यंत अनेक गोष्टीवर मुलभूत काम साधणारा येरळा पॅटर्न राज्यात आणि देशातही ग्राम सुधारणेचा, दुष्काळ निर्मूलनासाठी पथदर्शी म्हणून स्वीकारला पाहिजे.

No comments:

Post a Comment