सोळाव्या शतकात पराक्रमाच्या जोरावर जी घराणी राज्यकर्ते बनली ,त्यामध्ये जत तालुक्यातील डफळे हे एक घराणे होय. मूळचे राजस्थानातील बांववडे येथील हाडा चौहान या शूर राजपुतांचे ते वंशज. दुदा, शार्दूलराजे व सटवाजीराव हे डफळे घराण्याचे प्रमुख संस्थापक आणि पराक्रमी पुरुष म्हणून इतिहासात नोंद आहे.
आपल्या अतुलनीय शौर्याने आणि पराक्रमाने शिवपूर्व काळात व मराठेशाहीत दरारा निर्माण करणाऱ्या सरदारांमध्ये जतच्या डफळे घराण्याचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागतो. या घराण्यातील शूर सरदारांनी मोगलांशी अनेक वर्षे झुंज देऊन त्यांना सळो की पळो करून सोडले. मुत्सद्दीपणाने व पराक्रमाने महाराष्ट्राच्या इतिहासात ठसा उमटवला. मराठेशाहीच्या अस्तानंतर जत संस्थानाच्या प्रजाहितदक्ष अधिपतींनी लोकहिताचीकामे करून रयतेला सुखी केले. भूतपूर्व जत संस्थानच्या अधिपतींनी लोकाभिमुख कार्य करून प्रजाननांच्या आदरास पात्र झाले.
यलदोजी यांनी आदिलशाही दरबारात आपल्या कर्तृत्ववाने उच्च स्थान मिळवले.त्यामुळे त्यांच्या मनसुबीमध्ये वाढ झाली. यलदोजींचे लग्न डफळापूर चे पाटील लखोजी मोरे यांच्या मुलीशी झाले. यलदोजी यांना लखोजी व सटवाजी असे दोन पुत्र होते. डफळापूरचे लखोजी मोरे हे निपुत्रिक असल्यामुळे त्यांचे डफळापूरची पाटीलकी वतन त्यांचे नातू व यलदोजींचे ज्येष्ठ पुत्र लखोजी यांना मिळाले.
तेव्हापासून म्हणजे 1665 सालापासून या घराण्याला डफळे नामाभिमान प्राप्त झाले. यलदोजी यांना दुसऱ्या पत्नीपासून धोंडोजी या नावाचे पुत्र झाले. लखमाजी डफळे हेही निपुत्रिक वारल्याने त्यांच्या पत्नी भाऊजीसाहेब ऊर्फ येसूबाई यांनी आपले धाकटे दीर सटवाजी यांना दौलतीची मुखत्यारी दिली.
सटवाजीने पराक्रमाने आदिलशाहीत व पुढे मोगलाईत नावलौकिक मिळवला. सटवाजींचे कर्तृत्व पाहून आदिलशाहाने जतची जहागिरी दिली. आणि जत, करगणी, होनवाड, बारडोल या चार परगण्यांची देशमुखी वतन बहाल केली. सन1680 साली सटवाजींना मनसबदारी देण्यात आली ती पुढे मोगल सम्राट औरंगजेबाने 1707 साली कायम केली. विजापूर दरबारने 31 मार्च 1681 रोजी त्यांना वजीर हा किताब दिला. मोगलांनी रायगडाचा पाडाव केल्यानंतर सटवाजी छत्रपती राजाराम यांना जाऊन मिळाले. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या बरोबरीने त्यांनी काम केले. सटवाजी डफळे 1707 मध्ये इस्लामपूर (ब्रम्हपुरी) येथे बादशाही छावणीत मृत्यू पावले. सटवाजी लढाईसाठी बाहेर पडताना त्या काळातील सुप्रसिद्ध अवलिया चिनगीसाहेब यांचे दर्शन घेत. त्यांच्या आशीर्वादामुळे सटवाजींना प्रत्येक लढाईत यश मिळे म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून सटवाजींनी राजवाड्याच्या बुरुजावर पांढरा त्रिकोणी झेंडा लावण्याची प्रथा रूढ केल्याची आख्यायिका सांगितली जाते. सटवाजींप्रमाणे पुत्र बाबाजी हेही पराक्रमी होते. सातारा किल्ल्यासाठी पराक्रमाची शर्थ केली.
सटवाजींच्या मृत्यू नंतर त्यांच्या विधवा स्नुषा ( कै. बाबाजींच्या पत्नी) येसूबाई दौलतीचा कारभार पाहू लागल्या. आईसाहेब या नावाने त्या ओळखल्या जात. राजकारण धुरंधर आणि मुत्सद्दी महिला म्हणून लौकिक होता. छत्रपती शाहूंनी सातारा येथे व ताराबाईंनी कोल्हापूर येथे गादी स्थापन केली. यामध्ये वाद सुरू झाल्यावर आईसाहेब डफळे यांनी दोन्ही गाद्यांची बाजू घेऊन सामंजस्यांचा प्रयत्न केला. वृद्धापकाळ जवळ आल्याने येसूबाईंनी सावत्र दीर खानाजीराव यांचे पुत्र यशवंतराव यांना छत्रपती शाहूंच्या मान्यतेने दत्तक घेतले. येसूबाईंनी सुमारे 47 वर्षे जत संस्थानचा कारभार सांभाळला.
अमृतराव डफळे (पाहिले) यांच्यानंतर त्यांचे पुत्र खानाजीराव गादीवर आले. खानाजीराव यांनी पेशवाईच्या उत्तरकाळात झालेल्या बहुतेक सर्व लढायांमध्ये सहभागी होऊन आपल्या पराक्रमाची चुणूक दाखविली होती. सन १७९५ मध्ये झालेल्या खडर्याच्या सुप्रसिध्द लढाईत खानाजीरावांनी सहभाग
घेतला होता. याचकाळात महाराष्ट्रात इंग्रजांनी आपले पाय रोवण्यास सुरुवात केली होती. खानाजीरावांनी सन १८१६ पर्यंत राज्य केले. त्यांच्या नंतर थोरल्या पत्नी रेणुकाबाई यांनी जत संस्थानचा राज्यकारभार चालविला. त्यांनी सन १८२० साली ब्रिटीश सरकारशी तह केला. रेणुकाबाई १८२२ मध्ये वारल्यानंतर त्यांच्या धाकटया सवत साळुबाईसाहेबांनी जत संस्थानचा राज्यकारभार पाहिला. त्यांनी डफळे घराण्यातील
भाऊबंदापैकी रामराव यांना दत्तक घेतले.
श्रीमंत रामराव (पहिले)
श्रीमंत रामराब डफळे यांनी संस्थानचा अधिकार ग्रहण
केल्यानंतर जेव्हा साताऱ्यास प्रथम भेट दिली तेव्हा त्यांचा छत्रपतींनी मोठा सत्कार केला. त्यांनी १८३५ पर्यंत जत संस्थानचा कारभार पहिला रामराव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी श्रीमंत भागिरथीबाईसाहेब यांनी १८४५ सालापर्यंत संस्थानचा राज्यकारभार यशस्वीरितीने चालविला. त्यांनी सन १८४१ साली डफळे घराण्यातील भाऊबंदापैकी भीमराव यांना दत्तक घेऊन त्यांचे नाव अमृतराव (दुसरे) असे ठेवले.
ते अगदी लहान होते. त्यामुळे त्यांना १८५५ साली जत
संस्थानच्या अधिकारीची सुत्रे मिळाली. अमृतराव हे देशभक्त होते. १८५७ च्या बंडात सामील झाल्यावरून इंग्रजांनी अमृतरावांचा पुष्कळ छळ केला. १८७४ साली इंग्रजांनी अमृतरावांकडून जत संस्थानचा कारभार काढून घेऊन त्यांना पदच्युत केले. ही पदच्युती सन १८८५ पर्यंत सुरू ठेवली. या काळात अमृतराव राजवाड्यात इंग्रजांच्या नजरकैदेत होते. १८८५ मध्ये अमृतरावांना पुन्हा अधिकार देण्यात आले.
यावेळी अमृतरावांनी प्रजाजनांच्या मुलांना इंग्रजी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून इंग्रजी वर्ग सुरू केले. ही शाळा ए. व्ही. स्कूल या नावाने ओळखली जावू लागली. त्या शाळेचेच पुढे राजे रामराव विद्या मंदिर मध्ये रूपांतर झाले. सन १८८९ मध्ये इंग्रजांनी पुन्हा अमृतरावांकडून कारभार काढून घेतला. सर्व मालमत्ता व वतन जप्त केले. त्यामुळे अमृतराव पुण्यास राहू लागले. अमृतरावांचे निधन १८९२ मध्ये पुणे येथे झाले. अमृतराव यांना लक्ष्मीबाईसाहेब, धोंडूबाईसाहेब
आणि आनंदीबाईसाहेब अशा तीन राण्या होत्या. आनंदीबाई यांचेपासून यशोदाबाई नावाचे कन्यारत्न अमृतराव यांना मिळाले होते. या राजकन्येचा विवाह साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचेशी १८९९ साली झाला.
अमृतराव (दुसरे) यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या थोरल्या पत्नी लक्ष्मीबाईसाहेब यांनी उमराणी येथील भाऊबंदापैकी बुवाजीराव यांना दत्तक घेवून त्यांचे नाव रामराव ठेवले. ११ जुलै १९०५ रोजी संस्थानची सुत्रे स्वीकारली. राजे रामराव यांनी प्रजेच्या हिताची अनेक कामे जत संस्थानाकडे केली. राजे रामराव यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी पुतळाराजे उर्फ
भागिरथीबाईसाहेब यांनी जत संस्थानात मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली.
राजे रामराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे द्वितीय पुत्र विजयसिंह जत संस्थानच्या गादीवर बसले. राजघराण्याच्या परंपरा पुढे चालविणाऱ्या विजयसिंह महाराज यांनी जत संस्थानमध्ये अनेक लोकहिताची कामे केली. विजयसिंह महाराज हे उत्तम क्रीडापटूही होते. रणजी ट्रॉफी सामन्यात त्यांनी महाराष्ट्र संघाचे कप्तानपद भूषविले होते. त्यांच्या पत्नी श्रीमंत उषाराजे यांनीही संस्थानातील मुलींसाठी शैक्षणिक व क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आठ मार्च १९४८ रोजी जत संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले.

![]() |
श्रीमंत रामराव महाराज डफळे |
![]() |
श्रीमंत अमृतराव महाराज डफळे |
डफळे घराण्याचे वारसदार
सोळाव्या शतकात आपल्या पराक्रमाच्या जोरावर जी
अनेक घराणी राज्यकर्ते बनली त्यामध्ये जत तालुक्यातील डफळे घराणे हे एक घराणे होय. मूळचे राजस्थानातील बांबवडे येथील हाडा चौहान या शूर, पराक्रमी राजपुतांचे ते वंशज आहेत. दूदा, शार्दुलराजे व सटवाजी हे डफळे घराण्याचे प्रमुख संस्थापक व पराक्रमी पुरुष म्हणून इतिहासात नोंद आहे. सटवाजी यांनी १६७२ साली जत येथे राजवाडा बांधून
डफळे घराण्याची अधिकृत मुहूर्तमेढ रोवली तर राजे रामराव यांनी खऱ्या अर्थाने डफळे घराण्याचा कळस चढविला. स्वातंत्र्यानंतर भारतातही राजे विजयसिंह डफळे यांनी आमदार, खासदार, लेफ्टनंट कमांडंट, साखर कारखान्याचे संस्थापक अशी पदे भूषविली. त्यांचे बंधू भाऊसाहेब महाराज हे पोलीस दलात उपायुक्त होते. सध्या श्रीमंत अनिलराजे
डफळे हे यांचे चिरंजीव शार्दूलराजे डफळे या डफळे घराण्याचे वारसदार आहेत.
डफळे घराण्यातील प्रमुख राजे
सटवाजी राजे १६७२-१७०६, राणी येसूबाई, १७०६-१७५४, यशवंतराव, १७५४-१७५९, पहिले अमृतराव, १७५९-१७९९, खानाजीराव १७९९-१८१६, राणी रेणुका बाईसाहेब -१८१६-१८२२, राणी साळुबाई १८२२-१८२३, राजे रामराव (पहिले) -१८२३-१८२५,
राणी भागिरथीबाई -१८२५-१८४५, राजे अमृतराव (दुसरे) -१८४५-१८९२, राजे विजयसिंह १९२८-१९४८

No comments:
Post a Comment