लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेली जत येथील श्री यल्लम्मा देवी ही नवसाला पावणारी, भक्ताच्या हाकेला ओ देणारी म्हणून सर्वदूर प्रसिध्द आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री यल्लम्मा देवीची यात्रा संस्थानपूर्व काळापासून जतच्या दक्षिणेस दीड किलोमीटरवर असलेल्या गंधर्व नदीच्या काठावर भरते. लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री यल्लम्मा देवीच्या महात्म्याविषययी भक्तांच्या हाकेला धावून आख्यायिका प्रसिध्द आहे.
शिवकाळातील १६०० मध्ये जतचे श्रीमंत डफळे सरकार लवाजम्यासह सौंदतीच्या यल्लम्मादेवीस दर अमावस्या व पौर्णिमेस जात. त्यांची ही तपश्चर्या बरीच वर्ष सुरू होती. डफळे यांच्या पुर्वजांनी कोणत्याही परिस्थितीत देवीचे दर्शन चुकविले नाही. कालांतराने एवढया लांब प्रवास करणे शक्य होत नसल्याने त्यांनी देवीलाच सौंदतीहून जत येथे येण्याची आळवणी केली. त्यानंतर देवीने स्वप्नात येवून डफळे यांना दृष्टात दिला व सांगितले ‘राजा मी तुझ्या मागे सौंदतीहून येते पण काही झाले तरी मागे वळून पहायचे नाही' अशी अट घातली. देवीने स्वप्नात येवून सांगितल्याप्रमाणे राजे देवीचे दर्शन घेण्यासाठी जतहून सौंदतीला जाण्यासाठी घोडयावरून निघाले. राजे सौंदतीच्या श्री यल्लम्मा देवीचे शेवटचे दर्शन घेवून जतकडे परतत असताना देवीही त्यांच्या मागोमाग जतकडे येण्यासाठी निघाली.
राजे कर्नाटकातील कोकटनूर या ठिकाणी आले असता
आपल्या मागे खरोखरच देवी येत आहे का? या उत्सुकतेपोटी त्यांनी मागे वळून पाहिले याच वेळी देवी ज्याठिकाणी उभी होती त्याठिकाणी मोठा स्फोट होवून धरणीकंप झाला व देवी धरतीमध्ये अंतर्धान पावली. ज्या ठिकाणी कोकटनूर येथे देवी अंतर्धान पावली होती त्या ठिकाणी राजांनी भव्य मंदिर बांधून त्यात देवीची मूर्ती प्रतिष्ठापना केली. सध्या हे मंदिर कोकटनर
येथे आहे. देवीस जतला आणण्यास आपण अपयशी ठरलो अशी भावना राजांच्या मनात निर्माण झाली व त्यांनी पुन्हा भक्तीभावाने देवीची भक्ती सुरू केली. राजाच्या भक्तीवर प्रसन्न झालेल्या देवीने राजास पुन्हा स्वप्नात येवून 'गंधर्व नदीच्या काठावर माझे छोटेसे देऊळ बांध' असे सांगितले. त्यानंतर राजांनी देवीच्या सांगण्यावरून गंधर्व नदीच्या काठावर श्री यल्लम्मा देवीचे आकर्षक मंदिर बांधले. मंदिर तीनशे वर्षापूर्वीचे आहे.
दुसरी आख्यायिका अशी सांगितली जाते की, कर्नाटक
राज्यातील कोकटनूर येथे जाऊन देवीचा उत्सव साजरा केला जात होता पण संस्थानपूर्व काळात कोकटनूर येथे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरल्याने भाविकांना देवीचा उत्सव साजरा करणे शक्य झाले नाही. पर्याय
म्हणून जत येथेच श्री यल्लम्मा देवीची यात्रा भरविली जाते. तेव्हापासून जत येथे यात्रा भरविली जात असल्याचे सांगितले जाते.
यल्लाम्मा या कानडी शब्दाचा मराठीत अर्थ पाहिल्यास “यल्ले अम्मा' म्हणजे "आई तू कोठे आहेस ?' असा लावण्यात येतो. भक्तांना दिलेल्या दृष्टांतात देवीने मी येथेच असल्याचे सांगितल्यानंतर देवीची स्थापना येथे करण्यात आली आहे. पुर्वी देवीची यात्रा या ठिकाणी भरत नव्हती. त्यावेळी जत संस्थानचे राजे रामराव महाराजांनी संस्थानचा दौरा करून भाविकांना यात्रेला जाण्या-येण्यासाठी पैसे देवून यात्रा भरविली. मार्गशिर्ष महिन्यातील अमावस्येपुर्वी यात्रा भरविण्याचे त्यावेळी निश्चित करण्यात आले. सन १९१२ साली महाराजांनी यात्रेसाठी नियमावली व यात्रा भरण्याची जागा निश्चितीचा नकाशा तयार केला असून आजही तो नकाशा अस्तित्वात आहे.
संस्थान काळात जत शहरासाठी नगरपालिका होती. या संस्थेचे उत्पन्न वाढावे व यात्रेला शिस्त यावी म्हणून या यात्रेचे नियोजन तत्कालीन नागरपालिकेकडे सोपविले. मध्यंतरी बरीच वर्षे जत शहरात ग्रामपंचायत होती, तेव्हा त्यांच्याकडेच नियोजन होते. आजही नियोजन त्यांच्याकडेच आहे. आजतागायत श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेच्या तारखा नियोजन व इतर बाबीचे नियोजन डफळे घराणेच करते. एवढेच नव्हे तर पुढील वर्षाच्या यात्रेचा कार्यक्रम चालू यात्रेच्या मुख्य दिवशी प्रसिध्द करण्याची प्रथा आहे. ती प्रथा आजही कायम आहे.
सत्तर एकराच्या परिसरात भरणारी यात्रा आठ दिवस भरत असली तरी गंध ओटी, नैवेद्य व किचाचा असे तीन मुख्य दिवस आहेत. यात्रा मार्गशीर्ष वद्य नवमी ते अमावस्येपर्यंत भरते. यात्रेच्या प्रमुख दिवसापैकी पहिला दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील वद्य दशमी होय. हा दिवस गंध-ओटी या नावाने ओळखला जातो.
या दिवशी हजारो नवस बोललेले भाविक आपल्या राहत्या ठिकाणापासून लोटांगण घालत देवीच्या चरणी येतात. धारिक पध्दतीने स्नान करून आहे त्या पेहरावात लिंब नेसून देवींचे मोठया भक्तीभावाने दर्शन घेतात. गंध-ओटीने पुजा करतात.
दुसरा दिवस मार्गशीर्ष वद्य एकादशी होय. या दिवशी भाविक देवीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी देवीच्या दर्शनासाठी आलेले दूर-दूरचे भाविक भल्या पहाटे स्नान करून नैवेद्याच्या मागे लागतात. मिळेल त्या जागेत चूल मांडून नैवेद्य तयार केला जातो. यात्रेच्या शेवटचा मुख्य दिवस म्हणजे मार्गशीर्ष वद्य द्वादशी होय. हा किचाचा दिवस. यादिवशी देवीचा पुजारी लंघन (उपवास) पाळून पहाटे आलेल्या भक्तांसमवेत पालखी व जगसमवेत श्रीमंत राजेसाहेबांच्या भेटीस जातात व त्यानंतर शहरातून पालखीची सवाद्य मिरवणूक काढली जाते.
बाराच्या सुमारास धार्मिक पध्दतीने मंदिराभोवती पालखी व जगाची प्रदक्षिणा घातली जाते. त्यानंतर मंदिरापासून किचाच्या ठिकाणापर्यंत पुजारी उलट्या दिशेने पाठमोरे होवून चालत जातो. किचाच्या जागी आल्यानंतर पुजारी धगधगत्या गोवऱ्याच्या अग्नीतून प्रवेश करतो व बकऱ्यांचा नेवैद्य पार पाडतो. या विधीस किच' असे म्हटले जाते. किचचा विधी पार पडल्यानंतर देवीचा दरवाजा अमावस्येपर्यंत बंद केला जातो.
खिलारी जनावरांसाठी प्रसिध्द यात्रा जतची श्री यल्लम्मा देवाची यात्रा खिलारी जनावरांची यात्रा म्हणूनही ओळखली जाते. खिलारी जनावरांची पैदास व संगोपन करण्यास उत्तेजन मिळावे म्हणून यात्रेत खिलार जनावराचे प्रदर्शन भरविले जाते. उत्तम जनावरांना बक्षीस दिले जाते. ही प्रथा फार पुर्वीपासून आहे. संस्थानकाळात १८९३ साली नगरपालिका होती त्यानंतर १९५३ साली ग्रामपंचायत स्थापन झाली. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून जनावरांचे बक्षीस ग्रामपंचायत द्यायची त्यानंतर १९८७ च्या यात्रेपासून जनावरांचा बाजार मार्केट कमिटीकडे गेल्याने तेव्हापासून बक्षीसाचे वाटप त्यांच्यावतीने करण्यात येते.

No comments:
Post a Comment