जत तालुक्यातील बिळूर येथील काशी काळभैरव मंदिरास अनेक वर्षांचा इतिहास आहे. माघ पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते. राज्यासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या बिळुरचा काळभैरव हा भक्तांच्या हाकेला धावुन जातो. 'हरभंडी' या थरारक शर्यतीमुळे या मंदिराची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील काळ्या कुळकुळीत पाषाणातील चमकदार नंदी व आतील शिवलिंग सुमारे ७०० ते ८०० वर्षापूर्वीचे असल्याचे सांगण्यात येते. कलचुरी व यादव राज्याच्या काळात जी मंदिरे बांधण्यात आल्याची आढळतात. त्यातील हे एक अतिप्राचीन मंदिर आहे. सध्या हे जुने मंदिर पाडून त्याठिकाणी कोट्यवधी रूपयाचे नवे नियोजीत मंदिर बांधण्यात येत आहे.
काशी काळभैरव काशीहून दक्षिणेत बिळुर येथे कसे आले, याची आख्यायिका सांगितली जाते. ती अशी, बिळुर येथे सोमलिंगा नावाची एक व्यक्ती राहत होती. मुळात शेतकरी कुटुंबात जन्मलेला सोमलिंगा स्वत:च्या १०० हून गायी घेवून जवळच असलेल्या नागझरी या परिसरात गायी चरणास जात. गायींना चरण्यास मोकळे सोडून परिसरातील बेलाच्या झाडाखाली ध्यानस्त होवून जप करीत असे. सूर्यास्त होताच गायी स्वत:च्या गळ्यातील बांधलेल्या घंटा वाजवून सोमलिंगास घरी परतण्याचे संकेत देत. असे नित्य नियमाने चालत असे.
सोमलिंगा वृक्षाखाली ध्यानस्त बसत असताना त्यांचे बाह्य पंचद्रीये अंर्तमुख होत असे. परंतु त्यांना अगोचर रूप स्वरूपाचे कधीही दर्शन झाले नव्हते. तारुण्यापासून शतकाच्या जवळपास बिळुरचे भक्त शिरोमणी सोमलिंगाची भक्ती पाहून स्वतःचे मुळ वाहन बदलून काशी काळभैरव काळ्या घोड्यावर पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर नागझरी येथे आले. त्याचवेळी ओढ्याकाठी घोड्याचा एक पाय घसरला. ज्या पाषाणावर घोड्याचा पाय घसरला त्या घोड्याच्या पायाचे ठसे आजही दिसतात. घोड्याचा पाय घसरल्याचा आवाज ऐकून सोमलिंगा ध्यानातून जागा झाला. तेंव्हा त्याला आक्राळ विक्राळ व अतिभीषण भयानक रूप दिसले. हे रूप पाहून सोमलिंगा घाबरला नाही. त्याने निरखून पाहिले. तेंव्हा त्याला त्यात अष्टरूपाचे विशिष्ट असे स्वरूपदर्शन झाले.
सोमलिंगा बसलेल्या जागेवरून उठून लगेचच देवाच्या पायावर मस्तक ठेवले. अशा प्रकारे सोमलिंगाच्या भक्तीवर प्रसन्न झालेले काशीचे काळभैरव नागझरी येथे प्रकटले. भैरव देवाच्या घोड्याला तहान लागली होती. पण बाजुचा संपुर्ण ओढा सुकलेला होता. आसपास कुठेही विहीर नव्हती. ओढ्याच्या शेजारीच भैरवाने एक जलकुंड काढले व त्या कुंडात कांही क्षणातच चार मोठे झरे निर्माण झाले. या झऱ्याच्या वेगाने जलकुंड भरून वाहू लागला. कुंडाच्या बाहेर पडलेले पाणी बिळूर गावात जावून शिरले. त्यावेळी काशी काळभैरवांनी सोमलिंगाला सांगितले, 'ज्या ठिकाणी हे पाणी जावून थांबेल त्याठिकाणी माझा वास असेल' असे सांगितले. त्याप्रमाणे देवाचे घोडे, गाईचा कळप पाणी पिऊन देवा बरोबर सोमलिंगा त्या वाहत्या पाण्याच्या बाजुने पावले टाकत टाकत जावू लागला. नागझरीतून निघालेले हे पाणी बिळूर येथील सोमलिंगाच्या गोठयाच्या मध्य भागात येवून थांबले. जेथे पाणी थांबले तेथे एक उंबरा होता व त्या उंबऱ्यावर देव बसले व त्यांनी रात्रभर नमः शिवाय चा जप केला.
काशीतील झरा
काशी काळभैरवांनी ज्या ठिकाणी जलकुंभ तयार केले होते. तेथील चार झरे हे काशीतील कपालमोचन सरोवराचे असल्याचे मानले जाते. काशीत जो स्नान करेल त्याचे पाप धुतले जाते, असे म्हटले जाते त्याचप्रमाणे अष्टमीला जो कोणी शिवाचे नामस्मरण करून या जलकुंडात स्नान करेल त्याचे पाप धुतले
जात्याचे मानले जाते.
हरभंडीचा थरार
भक्तजनांना दर्शन दिल्यानंतर सोमलिंगा व देव एकदा
बाहेर फिरायला निघाले होते तेव्हा त्यांना निवास स्थानासमोर बैलगाडया दिसल्या. देवाने सोमलिंगास तू व मी एक-एक गाडी घेवून नागझरीस जावू असे सांगितले व त्याप्रमाणे ते निघाले. बैलगाडीस काशीमध्ये हरभंडी म्हणतात. हरभंडीस शिवरथ असे
म्हणतात. देव व सोमलिंगा ज्याठिकाणी थांबले होते त्याठिकाणी दरवर्षी पौर्णिमेच्या नंतर हरभंडीचा थरार पहावयास मिळतो. हरभंडी झाल्याशिवाय भाविक परतत नाहीत.
भैरव मूर्तीची स्थापना
हरभंडीनंतर देव सोमनाथाबरोबर आला व रात्री त्याला
दृष्टांत दिला. वेश बदलून मी तुझ्याकडे आलो आहे. यापुढे मी ज्या जागेत झोपलेलो आहे त्या जागेत मी त्रिकाळ वास करणार असल्याचे सांगितले. दृष्टांतानंतर सोमलिंगास जाग आली तेव्हा त्यांनी पाहिले की काळभैरव घोडा सोडून अदृश्य झाले होते. ज्याठिकाणाहून काळभैरव अदृश्य झाले त्याच
ठिकाणी काळभैरवाची स्थापना करण्यात आली आहे. नागझरीत काळभैरवांनी स्थापन केलेले बाणलिंग गावातल्या शिवमंदिरामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. प्रथम पुजारी म्हणून देवाने - सोमलिंगाला कौल दिल्याने आजही सोमलिंगाचे वंशजच कालभैरवाचे पुजारी आहेत.

No comments:
Post a Comment