जत तालुक्याच्या साहित्य क्षेत्रास फार मोठी परंपरा नाही. ज्या मोजक्याच साहित्यीकांनी लेखक केले, त्यांनी आपल्या नावाचा सुस्पष्ट ठसा उमटविला आहे. त्यापैकी एक आहेत, मच्छिंद्र गोरखनाथ ऐनापुरे. प्राथमिक शिक्षक, अभ्यासू पत्रकार व साहित्यीक म्हणून त्यांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या साहित्याचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. जत तालुक्यातील ते असे एकमेव साहित्यिक आहेत, ज्यांची पाठ्यपुस्तक मंडळाने घेतली आहे. बालकथा, विनोदी कथा, व्यक्तीचित्रे व वृत्तपत्र लेख असे त्यांनी विपुल लेखन केले आहे.
मच्छिंद्र ऐनापूरे यांचा जन्म दि. १ जून १९७४ रोजी मुचंडी ( ता.जत जि. सांगली) येथे झाला आहे.ते मूळचे जतचे रहिवाशी आहेत. त्यांचे शिक्षण जत, सांगली आणि मिरज येथे झाले. ते पदवीधर प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. जत तालुक्यातील उंटवाडी, जत नंबर ३, अमृतवाडी, लमाणतांडा (निगडी बुद्रुक), एकुंडी आदी गावांमधील शाळेत त्यांची सेवा झाली आहे. त्यांचे ‘जंगल एक्सप्रेस', 'मौलिक धन' , 'गोष्टी स्मार्ट बालचमूच्या' हे बालकथासंग्रह, 'हसत जगावे' हा विनोदी कथासंग्रह तर 'सामान्यातील असामान्य' हा व्यक्तीचित्रसंग्रह प्रकाशित झाले आहेत. याशिवाय त्यांचे दहाच्यावर विविध विषयांवरचे ब्लॉग आहेत. याचा लाभ देश आणि जगभरातील लोक घेत आहेत. याशिवाय सर्वच आघाडीची दैनिके, साप्ताहिके, मासिकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. पंचवीस वर्षांपासून ते पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. 'जनप्रवास', 'केसरी','प्रभात', 'महासत्ता', 'संचार' या दैनिकात काम केले आहे. २०११पासून त्यांनी
स्वत:चा ब्लॉग तयार केला असून त्यावर १४०० पेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. याशिवाय 'जत न्यूज' हे न्यूज पोर्टलही ते चालवत आहे. चित्रपट, जनरल नॉलेज, आरोग्य, बालसाहित्य, हिंदी साहित्य, चित्रकला, प्रेरणादायी आदी विषयांवर त्यांचे लेखन विविध ब्लॉगवर सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ, पूणे यांनी २०१७ या वर्षांतील इयत्ता आठवीच्या बालभारती पुस्तकात त्यांच्या लेखाची निवड केली आहे. त्यांची 'धाडसी कॅप्टन: राधिका मेनन' ही शौर्यकथा पाठ्यपुस्तकात घेण्यात आली आहे. जत तालुक्याच्या साहित्य वैभवात भर टाकणारे ते लेखक म्हणून नावारूपास आले आहेत.

No comments:
Post a Comment