Tuesday, May 19, 2020

चालुक्य कालीन माडग्याळचे शिवमंदिर

हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जत तालुक्यातील माडग्याळ येथील हेमाडपंथी मल्लिकार्जुन मंदिर अतिप्राचीन आहे. प्राचीन काळात मंगळवेढ्याचा राजा  महामंडलेश्वर हेमाडीदेव आणि त्यांची पत्नी पट्टणमहादेवी (चंदला देवी) यांनी त्याकाळी मोठी देणगी या मंदिरासाठी दिल्याची नोंद आहे.
प्राचीन काळात हेमलिंगेश्वर नावाने ओळखले जाणारे हे मंदिर नंतर मल्लिकार्जुन मंदिर म्हणून ओळखले जाते. जत तालुक्याच्या प्राचीन इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या हेमाडपंथी मंदिराची पुरातत्व विभागाकडे  नोंद आहे.  हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जत तालुक्यातील माडग्याळ येथील हेमाडपंथी मल्लिकार्जुन मंदिर अतिप्राचीन आहे. मंगळवेढ्याचा राजा महामंडलेश्वर हेमाडीदेव आणि त्यांची पत्नी पट्टणमहादेवी (चंदलादेवी) यांनी त्याकाळी मोठी देणगी या मंदिरासाठी दिल्याची नोंद आहे. प्राचीन काळात हेमलिंगेश्वर नावाने ओळखले जाणारे हे मंदिर नंतर मल्लिकार्जुन मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.
जत तालुक्याच्या प्राचीन इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या हेमाडपंथी मंदिराची पुरातत्व विभागाकडे नोंद आहे. मोठ्या एकसंघ दगडावर नक्षीकाम करून मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिरातील कोरीव काम म्हणजे हस्तमंदिराची पुरातत्व कारागिरीचा एक उत्तम नमुना आहे. तत्कालिन युद्धप्रसंग दगडांवर कोरलेले आहेत. गाभाऱ्यातील पिंड आणि समोरचा नंदी एकाच दगडात घडवलेला आहे. देवी अंबामाता आणि विठ्ठल रूक्मिणीची मूर्तीही मंदिरात आहे. पूर्वी मंदिरासमोर जलकुंभ होता. पण, सध्या तो बंद आहे.
माडग्याळचे प्राचीन नाव माडगीहाळ असे होते. येथील
शिवमंदिर किमान एक हजार वर्षापूर्वी बांधलेले आहे.
या देवालयासमोर सापडलेल्या प्राचीन कानडी भाषेतील शिलालेखात कलचुरी वंशातील सम्राट संकमदेव आणि राजा भिल्लम यादव (देवगिरीचा राजा) यांनी मंदिराला २७ जानेवारी ११७२ (शके १०९३, फाल्गून अमावस्या, नंदन संवत्सर) ला देणगी दिल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. शिलालेखात मंगळवेढे गावाचा मंगळीवेढ आणि काळांजरी या गावांचा तसेच वासुबिगे (सध्याचे वासुंबे, ता. तासगाव), जत तालुक्यातील
लोणार आणि याच तालुक्यातील आजचे सनमडी (प्राचीन नाव सणम्बडे) या गावांचा उल्लेख आहे. त्याचबरोबर जत तालुक्यातील सावकार, अंमलदार व साधुची नावेही शिलालेखात नमूद आहेत.
दरवर्षी श्रावणच्या शेवटच्या सोमवारी येथे मोठी यात्रा
भरते. शिवभक्त मंदिरासमोर दीपोत्सव साजरा करतात. बारा, ज्योतीर्लिंगापैकी एक असलेल्या आंध्र प्रदेश येथील श्रीशैल्यम् येथील श्री मल्लिकार्जुन यांची प्रतिकृती आणण्यासाठी भाविक पायी जातात.

No comments:

Post a Comment