कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असणाऱ्या जत तालुक्याला प्राचीन आणि ऐतिहासिक मोठा वारसा लाभला आहे. अतिशय जुनी गावे येथे आहेत. आज या तालुक्यात १२० गावे आणि २५० हुन अधिक वाड्यावस्त्या आहेत. या सर्व गावांची नावे आणि त्यांचा इतिहासही वेगळा आहे. सर्वच गावांच्या नावाला इतिहास आहे. प्रत्येक गावाच्या नावाला काही ना काही इतिहास आहे. यातील काही निवडक गावांची नावे आणि इतिहास....
वज्रवाड- कुंतीमातेने गजगौरी व्रतासाठी गजाची
मागणी केल्यानंतर भीमाने इंद्राचा ऐरावत भूतलावर आणण्यासाठी चिखलाचे गोळे फेकले तर अर्जुनाने
शरसोपान उभा केला. भीम येत असल्याचे पाहून इंद्राने
भिमावर 'वज्रास्त्र' सोडले. हे वज्रास्त्र ज्या ठिकाणी पडले ते ठिकाण वज्रवाड, वजरवाड नावांनी ओळखले जावू लागले.
बिरनाळ -पूर्वी हे गाव 'बीरनहळ्ळ' म्हणून ओळखले
जात होते. 'बीर' म्हणजे कानडी भाषेत असूर. धीरनहळ्ळ म्हणजे 'असुरांचा ओढा. बिरनाळमध्ये
भिमाने आठ कुंड काढले हे कुंड आजही पहावयास मिळतात.
बनाळी- बनाळी गावचे श्री बनशंकरीचे देवस्थान
खूपच प्रसिध्द आहे. मंदिराभोवती दाट झाडांचे 'बन' आहे. त्यावरून 'बनहळळी' अर्थात बनाचे गाव हे
नाव पडले व पुढे या नावाचे त्रोटक रूपांतर 'बनाळी' असे झाले.
वाळेखिंडी -डोंगराच्या उंच उंच कडा त्याही वाळ्याच्या आकाराच्या असल्याने या गावाला वाळेखिंडी असे म्हणतात. याचठिकाणी ब्रिटीशांनी नॅरोगेज रेल्येचे स्थानक केले होते. आता येथे ब्रॉडगेज आहे. सोलापूर आणि पुढे विदर्भ भागात जाण्यासाठी या रेल्वेचा प्रवाशाना चांगला उपयोग होतो.
बिळूर- बिळूर यांचा खरा अर्थ 'बिळक उरा असा आहे. कानडी भाषेत यास 'पडके गाव' असे संबोधले जाते. आजही पडक्या गावचे अवशेष शेजारी एका डोंगरावर दिसतात. येथे कालभैरव देवाची मोठी यात्रा भरते. या गावा परिसरात द्राक्षबागा भरपुर आहेत. पूर्वी येथे पानमळे भरपूर होते. मुंबई-पुण्यासह अनेक भागात येथील पानं जात होती. बिळूरला पान मळ्याचे गाव म्हणून जिल्ह्यासह महाराष्ट्रात प्रसिद्ध होते, मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे पण मळे नामशेष झाले.
जत -जतचे पूर्वीचे नाव 'जयंती' होते. इथेच भीमाने
बकासुराचा वध केला. हा परिसर रामायण व
महाभारतकालीन आहे, तसे पुरावेही मोठया प्रमाणात आहेत. जत, जयंती व एकचक्रा ही नावे एकाच ठिकाणची आहेत.जत हे संस्थानकालीन गाव आहे. गंधर्व नदीच्या पश्चिमेला गाव वसले होते. आज जो दक्षिण-उत्तर ओढा वाहतो, त्याचे पात्र मोठे होते. हीच गंधर्व नदी म्हणून ओळखली जाते. या नदीच्या ओढ्याच्या पूर्वेला आता जी वस्ती उभी राहिली आहे, ती बाहेरून आलेल्या लोकांची वस्ती आहे. विशेषतः व्यापारासाठी लोक कर्नाटक, राजस्थान, गुजरात या भागातून लोक आले आणि स्थायिक झाले.
घोलेश्वर -प्रभु रामचंद्रांनी वनवासात असताना येथे
महादेवाचे गोल लिंग स्थापन केले होते, त्यावरून
यांचे नाव 'गोलेश्वर' व पुढे 'घोलेश्वर' म्हटले जावू लागले.
येळदरी- या गावाजवळ सात झरे एका ठिकाणी आले असून कानडी भाषेत सातला 'येळ' म्हणतात. त्यावरून गावचे नाव येळदरी पडले आहे.
सिंदूर -मंगलमूर्ती गजाननाने “सिधूर' या राक्षसाचा वध केला व भक्तावरील संकट दूर केले ते ठिकाण आज 'सिंदूर' नावाने ओळखले जाते.
बेवनूर - बनऊर' म्हणजे असुरांचे गाव. त्यावरून या गावाला 'बेवनूर' असे नाव पडले. बकासुराचा वध इथेच झाल्याच्या विधानाला पुष्टी मिळते.
बालगाव- बाल-अलम-प्रभुचे प्रसिध्द मंदिर येथे असून त्यावरूनच बालगाव हे नाव या खेड्याला मिळाले आहे.
मुचंडी -मुचंडी गावी मुचकुंदेश्वर ऋषींनी तपश्यर्चा केली. त्यांच्या नावावरूनच गावाला मुचंडी नाव पडले.
अचकनहळळी बकासूरच्या भावाचे नाव 'अचकासूर' होते. अचकासुराच्या नावावरून 'अचकन हळळी' हे नाव पडले.
मल्लाळ- भीम व अन्य मल्ल ज्या ठिकाणी दररोज कुस्तीचा सराव करत होते त्यास मल्लाळ असे नाव पडले.
उमदी -उमा, अदित्य या नावावरून 'उमदी' हे छोटे
नाव पूर्वी प्राप्त झाले.
पांडोझरी -पांडवांचा झरा' किंवा नाला यावरून गावाला
पांडोझरी असे नाव पडल्याचे सांगितले जाते.
कोंते बोबलाद-कोत्यव्वा बोबलाद कोत्यव्वा' या कानडी शब्दाचा अर्थ 'कुंती माता' असा होता. इथे कुंती मातेचे मंदिर असून दरवर्षी मोठ्या उत्साहात यात्रा भरते.

No comments:
Post a Comment