श्री निंबरगी महाराज व श्री भाऊसाहेब महाराज यांचा उल्लेख साक्षात तुकाराम महाराज असा केला जातो. भाऊसाहेब महाराजांची योग्यता मोठी होती. त्यांनी नामाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहचवले. नाम निंबरगी महाराजांनी स्वर्गातून आणले आहे,तेच नाम आपण भक्तांना देत आहोत असे ते सांगत. भाऊसाहेब महाराजांबद्दल भक्ती आहे. त्यांच्या संदर्भात कथा व दृष्टांत दिले जातात.
उमदीचे मलकारसिद्ध देवस्थान प्रसिध्द आहे. त्याचबरोबर श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर (हिंचगेरी) यांच्या पारमार्थिक वास्तव्याने उमदी परिसर पावन झाला आहे. श्री भाऊसाहेब महाराज यांना श्री नावाने संबोधले जात असे. ते जागृत साधक होते. आपल्या देशात जे अनेक सांप्रदाय आहेत त्यातील नवनाथापैकी रेवणनाथ किंवा रेवणसिध्द यांच्यापासून जी एक संतपरंपरा सुरू झाली त्यामध्ये श्री भाऊसाहेब उमदीकर हे थोर सत्पुरुष झाले. श्री निंबरगी महाराजांचे प्रमुख शिष्य श्री भाऊसाहेब महाराज हे होते त्यांना बालवयातच सद्गुरूंचा अनुग्रह मिळाला होता. त्यांनी खडतर साधना करून परमार्थातील अत्युच्च पदवी प्राप्त करून घेतली होती. कुशाग्र बुध्दी, एकनिष्ठ भक्तीभाव, परमार्थिक अनुभव यामुळे ते आपल्या सदगुरूंच्या जीवनाची समरस झाले होते.
श्री भाऊसाहेब महाराज यांच्या संदर्भात आख्यायिका सांगितल्या जातात. एकदा भाऊसाहेब घोडयावर बसून उमदीहून गावास जाण्यास निघाले. त्यांच्याबरोबर त्यांचा शिष्य व सेवक शेट्यप्पा होत्या. वाटेत नेमाची वेळ झाल्याबरोबर भाऊसाहेब घोडयावरून उतरले आणि शेजारीच असलेल्या ओढयाजवळ ध्यानास बसले. थोडयाच वेळात ते ध्यानमग्न झाले. ध्यानमग्न झाल्यानंतर त्यांनी आपल्या अंगावरील वस्त्रे भराभरा काढून फेकून दिली आणि तशा विवस्त्र अवस्थेतच ते बऱ्याच वेळ ध्यानमग्न बसले होते. भाऊसाहेब एकदा तेरदाळ ग्रामी असताना सायंकाळी फार वेळ नेमास बसले. रात्रीचे १० वाजले तरी ते नेमातून उठले नाहीत. बाहेर पोथी, प्रवचन व भजनासाठी भक्तगण येवून बसले होते. श्रीचे सेवक श्री रामभाऊ फडणीस श्रीच्या खोलीजवळ गेले आणि दाराची कडी त्यांनी जोरात वाजविली. तरी श्री नेमातून उठले नाहीत. श्रीच्या खोलीस नेहमी नेमाच्या वेळी बाहेरून कडी लावलेली असायची. अखेर आतमधून काहीच प्रतिसाद येत नसल्याने फडणीसांनी कडी काढून आत प्रवेश केला तेव्हा उन्मादावस्थेत बसलेले श्री देहभानावर आले. ' महाराज असे का झाले, इतका वेळ का लागला ?' असे फडणीसांनी श्रीस विचारले. तेव्हा भाऊसाहेब उत्तरले काय सांगू तेव्हा मी ज्या अवस्थेत होतो तिचे वर्णन करता येणे शक्य नाही. तुम्ही दाराची कडी वाजवित होता ते मला ऐकायला येत होते पण मला उठावेसेच वाटेना. अशा महाराज ध्यानातून उठून जेव्हा भाऊसाहेब बाहेर येत तेव्हा एक विलक्षण तेज चेहऱ्यावर तळपत असे. तुम्ही मला केवळ तीन दिवस ध्यानाकरिता सोडा म्हणजे मला कोण ओळखू शकतो पाहू असे याप्रकारच्या दिव्य परिवर्तनाविषयी श्री महाराज सतत म्हणत असे.
प्रो. रानडे इंचगेरीस राहत असताना ते बाबा (श्री अंबुराव महाराज) बरोबर अनुभवाविषयी चर्चा व विचारविनियम करत. श्रीनी पोथीच्यावेळी सांगितलेल्या विषयाचे स्पष्टीकरण श्री बाबा करीत. एकदा 'बयलिगे बयलू निर्बयलू' या अनुभवाविषयी चर्चा सुरू होती. साधकांना हा अनुभव जेव्हा येतो तेव्हा त्यांना प्रतीत होणारी ‘वस्तू' नाहीशी होते किंवा कसे? ती नाहिशी होते असे काही साधकांचे म्हणणे होते परंतु ती नाहिशी होते हा विचार प्रो. रानडे यांना बरोबर वाटला नाही. त्याविषयी श्रीचा अभिप्राय जाणण्याचा त्यांनी एकांतात प्रयत्न केला. त्यावेळी श्रीच्या खोलीत कोणीही नव्हते. रानडे यांचा प्रश्न ऐकून श्री म्हणाले ' हे पहा असलेली "वस्तू' नाहीशी होत नाही ती बाजुला सरकते आणि दुसरी वस्तु पुढे येते काही दिवसांनी त्यांना शिवलिंगव्यांनीही त्याविषयी सांगितले. एवढे पुण्य करून मिळविलेली ती वस्तु नाहीशी कशी होईल ?
एकदा श्री भावविश्व होवून नेमातून उठले आणि श्रीरामकृष्ण परमहंसाप्रमाणे शिष्याला उद्देशून त्यानी त्रिवार घोषणा केली.
'आता आम्हाला हवे असेल ते मागा' आणि लागलीच ते
खोलीत गेले. श्रीची घोषणा ऐकून शिष्य चकित झाले. कोणी काही मागितले नाही. सर्वत्र स्तब्धता पसरली. श्री नेम संपवून, बाहेर आल्यानंतर एका शिष्याने विचारले, 'महाराज आपण तेव्हा अशी घोषणा का केली?' श्री उतरले, 'काय म्हणून सांगू तेव्हा साक्षात भगवंतच आला होता तुम्ही मागितलेले सर्व काही त्यांने तुम्हाला दिले असते. चंगळ आणि भोगवादांच्या
मायावी दुनियेत व्यसनाधीनतेने भरकटलेल्या युवापिढीस तारणारे आणि समाजाची घडी बसविण्यासाठी पोषक तत्वज्ञान ह.भ. प. भाऊसाहेब महाराजांनी मांडले. त्यासाठी त्यांनी अध्यात्मास तत्वज्ञानाची जोड दिली.

No comments:
Post a Comment