महाशरणी दानम्माचे जीवनकार्य अनेक दिव्य भव्य अशा घटनांनी भरलेले असून वीरशैव लिंगायत धर्म संस्थापक श्री बसवेश्वरांच्या समकालीन असणाऱ्या श्री दानम्मादेवीची आख्यायिका सांगितले जाते.
देवीचा जन्मवृतांत
सुमारे आठशे वर्षापूर्वी म्हणजेच बाराव्या शतकात उमराणी या गावी पांचाळ सोनार समाजातील अनंतराव व शिरसम्मा हे सदाचारी शिवभक्त दांपत्य राहत होते. अनेक वर्षे त्यांना महाशरणी गुड्डापूरची श्री दानम्मा मुलबाळ नव्हते त्यांनी अपत्य प्राप्तीसाठी मल्लिकार्जुनाची (भगवान शंकर) भक्ती आरंभली. एके रात्री शिरसम्मास स्वप्नात दृष्टांत झाला. तुला कन्यारत्न होईल जन्मत:च कन्येच्या गळ्यात शिवलिंग बांध. पुढे शिरसम्माच्या पोटी कन्यारत्न झाले व तिने दृष्टांतानुसार जंगमास घरी बोलावून शिवलिंग बाळाच्या गळ्यात बांधले. जन्मत:च गळ्यात लिंग बांधल्याने तिचे नाव 'लिंगम्मा' असे ठेवण्यात आले.
लिंगम्माचे बालपण
लिंगम्माच्या बालपणापासूनच ईश्वर 'भक्तीत रमली होती. शिवलिंगाची पूजा, ध्यान हाच तिचा बालपणाचा खेळ होता व तीच तेच खेळ खेळत असे. ईश्वरभक्तीत रमलेल्या लिंगम्माचे बालपण सरले. आई व वडिलांनी तिच्या अनुरूप वरशोध मोहीम हाती घेतली व योग्यस्थळ आल्यास लिंगम्माचे लग्न करण्याचे ठरविले पण शिवभक्तीत तल्लीन झालेल्या लिंगम्माने 'योग्य वेळ येताच लग्न करेन' असे सांगून मातापित्याचा आशिर्वाद घेवून ती घरातून निघून गेली.
गुड्डापुरात अनुष्ठान
घरातून निघालेली लिंगम्मा गुड्डापूर येथे आली. डोंगररांगाच्या कुशीत आजूबाजूस फळाफुलांनी बहरलेल्या वृक्षवेली, निवडुंगाची दाटी, नजिकच झुळझुळ वाहणारा ओढा याठिकाणी लिंगम्माने अनुष्ठान आरंभले. या ध्यान साधनेतून लिंगम्मास आत्मज्ञान प्राप्त झाले तसेच आत्म साक्षातकार झाला. जीवनाचे मर्म कळले. देवीने गुड्डापूर येथे अनुष्ठान केलेले हे स्थान आज ‘कातर कंठी' म्हणून परिचित आहे.
कल्याणनगरीकडे प्रस्थान
अनुष्ठान संपल्यानंतर लिंगम्मा कल्याण
नगरीकडे निघाली. तेथे राजा बिज्जळचे राज्य
होते. बिज्जाळाचे महामंत्री श्री बसवेश्वरांनी
त्याकाळी अनुभव मंडपाद्वारे समाज सुधारण्याचे व वीरशैव धर्माचे क्रांतीकारी कार्य सुरू केले होते. लिंगम्मा जेव्हा कल्याण नगराकडे निघाली, तेव्हा पायी प्रवासात तिला समाजातील दैन्य, दु:ख, दारिद्र्य पाहून मन हेलावत होते. जेथे जेथे लिंगम्मा थांबे तेथील
लोक या तेजस्वी महाशरणीच्या दर्शनास येत. त्यावेळी लोकांचे लक्ष दीनदरिद्री जनतेकडे वळवून रंजल्या, गांजलेल्यांना साह्य करणे हीच खरी ईश्वरी सेवा आहे, असा उपदेश लिंगम्मा करीत असे. मजल दरमजल करीत कल्याण नगरातील बिल्व वनात लिंगम्मा पोहोचली. तेथे महान अशी साध्वी आल्याचे समजताच
लोक मोठया संख्येने दर्शनासाठी गर्दी करू लागले. तेथे लिंगम्माची भेट महादेवी नामक शरणीशी झाली. या शरणीसमोर लिंगम्माने आपण 'अन्नादासोह' करणार असल्याची इच्छा व्यक्त केली व आपल्या दिव्य शक्तीने तिने एकाच वेळी एक लाख ९६ हजार जंगमाना, धर्मप्रसारकांना व गोरगरीबांना अन्नदान केले.
(महादासोह केला.) सर्वजण अन्नप्रसाद घेवून तृप्त झाले आणि लिंगम्मास 'दानम्मा दानम्मा' असे संबोधून मोठ्याने जयघोष करू लागले.
लिंगम्माचे दानम्मा लिंगम्माची किर्ती अल्पावधीतच कल्याण नगरीत सर्वत्र पसरली. बसवेश्वरांच्या कानी गेली. श्री बसवेश्वर स्वत: भेटीस आले. यावेळी बसवेश्वरांनी हे महादानी माते, आपण दानशूर आहात आपली दानम्मा अशी किर्ती होवो, असे उद्गार काढले
तेव्हापासून लिंगम्माचे दानम्मो असे नाव पडल्याची आख्यायिका आहे. आपल्या वरील कृतीतून श्री दानम्मादेवीने सर्वांना दानाचे महत्व पटवून दिले. दानम्माच्या या कार्याची महती सर्वदूर पसरली. अन्नदान हे श्रेष्ठदान या प्रेरणेने त्यानंतर ठिकठिकाणी अन्नक्षेत्रे उभी राहिली.
वरसंशोधन
दानम्मा सोलापूरहून गुड्डापूर क्षेत्री आली. आपल्या तेजस्वी कन्येसाठी आई वडिलांनी पुन्हा वरसंशोधन सुरू केले. सदाचारी, ज्ञानी व सतत शिवभक्तीत लीन असणारा सोमनाथ हा अनुरूप असा वर दानम्मासाठी निश्चित केला. संगतीर्थ येथे विवाहसोहळा संपन्न झाला.
दानम्मा व सोमनाथ यांचा विवाह गुड्डापूरपासून चार मैलावर 'निसर्ग सानिध्यात रमणीय अशा संगतीर्थ येथे करण्याचे निश्चित झाले. दानम्माने आपल्या विवाहाबरोबर गोरगरीबाच्या मुलामुलींचे विवाह व्हावेत असा विचार प्रकट केला. त्यानुसार संगतीर्थ येथे सोमनाथ व दानम्मा यांच्या समवेत एकाचवेळी
५५५ जणांचे विवाह झाले. त्याकाळी झालेल्या सामुहिक विवाहास आगळेवेगळे महत्व आहे.
विवाह बंधनात गुंतलेल्या दानम्मा व सोमनाथांनी काही दिवस वास्तव्य केले. या दांपत्यास सर्वसामान्याप्रमाणे केवळ ऐहिक जीवनात अथवा प्रपंचाच्या राड्यात गुरफटायचे नव्हते तर परस्पर सहकार्याने परमार्थ साधायचा होता. धार्मिक, सामाजिक सेवाकार्य पार पाडायचे होते. किंबहुना याच कार्यासाठी
विधात्याने दानम्मा व सोमनाथ यांना एका बंधनात बांधले होते. गुड्डापूर येथे वास्तव्यात त्रिकालपूजा, साधना, अन्नदान असे कार्य या दांपत्यांनी सुरू केले. दानम्माची किर्ती ऐकून अनेक दूरदूरचे लोक गुड्डापूरक्षेत्री गर्दी करू लागले. दानम्मा व सोमनाथ यांच्या विचाराने प्रभावीत होवून अनेक भक्तांनी
त्यांचे अनुयायित्व स्वीकारले. लिंगदिक्षा घेतली. लोकांच्या आग्रहावरून दानम्मा व सोमनाथंनी अनेक दूरच्या ठिकाणी भेटी दिल्या. मानवतावादी धर्माचा प्रचार व प्रसार मोहिम सुरू केली.
दानम्मा व सोमनाथचे देशभ्रमण
विवाहानंतर सोमनाथ-दानम्माने दक्षिण भारत भ्रमणास आरंभ केला. या देशभ्रमंतीत दानम्माने तुंगभद्रेकाठी
आलंपूर येथे परतत्ववाद्यांनी नदीत फेकून दिलेल्या शिवलिंगाची पुनप्रतिष्ठापना केली. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीशैल्य येथील
मल्लीकार्जुनाचे व भ्रमराविकेचे दर्शन घेतले. कांचीपूरम येथे राजा चोळ यास लिंगदिक्षा दिली. पशुबळी व नरबळीस त्यांनी विरोध केल्याची आख्यायिका सांगितली जाते. याशिवाय दानम्मा व सोमनाथांनी उत्तर भारतातील काशी, अमरनाथ, गया, प्रयाग, भीमाशंकर, परळी वैजनाथ, नागनाथ, महाबळेश्वर आदी क्षेत्रांना
भेटी दिल्या व दांपत्य गुड्डापूरला परतले.
दानम्मा समाधीस्त झाल्या
गुड्डापूरला परतल्यानंतर दानम्माने पती सोमनाथासह सर्व भक्तांना आपण समाधीस्त होणार असल्याचे सांगितले. गुरुवारच्या दिवशी स्नानादी आटोपून श्री दानम्माने शुभ्र वस्खे परिधान केली, भाळी त्रिपुंड भस्म व कुंकमतिलक लावले. दानम्मा समाधीस्त होणार
असल्याने भक्तांच्या मेळा गुड्डापुरात जमला होता व साश्रू नयनाने अश्रु ढाळत होता. भक्त अडगल्लेशाने पुजेची तयारी केली. देवी पुजारत झाल्या. एक प्रखर तेजस्वी जीवन अनंतात विलीन झाले असले तरी देवीचे आत्मचैतन्य आजही विश्वव्यापी स्वरूपात अस्तित्वात आहे.
देवीचे मंदिर
देवी समाधीस्त झाल्यानंतर गावच्या मधोमध रम्य स्थळी
देवीचे मंदिर उभारण्यात आले. मंदिर उत्तराभिमुख असून मुख्य गर्भगृहात पंचकोनी दगडी पिठासनावर काळ्या पाषाणातील अयत सुबक अशी देवीची पद्मासनातील मूर्ती आहे. मूर्तीच्या डाव्या हातात इष्टलिंग तर उजव्या हात आशीर्वाद देत आहे.
उजव्या हाताच्या अंगठ्यात जपमाळ आहे. तळहातावर चक्र व नक्षत्र कोरलेले आहे. गळ्यात कंठाभरण, बाहू अलंकार मंडित, दंडात रूद्राक्षमाळा, भालप्रदेशावर त्रिपुंड भस्म व त्यावर हळदीकुंकम तिलक अशा विलोभनीय रूपात देवीची मूर्ती आहे. बाराव्या शतकाची ऐतिहासिक परंपरा लाभलेले हे ठिकाण आज मोठे तीर्थस्थळ म्हणून उदयास येत आहे. देवीला श्री दानम्मा, वरदानी गुडम्मे, दानेश्वरी अशा अनेक नावांनी संबोधले जाते.
त्रिकाल पुजेची परंपरा
वरदायिनी श्री दानम्मा देवीची त्रिकाल पुजेची
परंपरा ही पूर्वापार चालत आलेली आहे. पहाटे, दुपारी व रात्री अशा तीन वेळची पूजा केली जाते व तिन्ही वेळी पुरणपोळीचा नैवेद्य देवीस दाखविला जातो.
या तीन वेळच्या पुजेचेही काही नियम आहेत ते पाळावेच लागतात. प्रात:कालीन पूजा ही दैनंदिन
पहाटे साडेचार ते सहा या वेळेत होते. सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत दुसरी पूजा केली जाते. पुजेप्रसंगी साडी तसेच झेंडू, शेवंती, चाफा आदी विविध फुलांच्या माला, अलंकाराचा वापर केला जातो. सायंकाळी साडेसहा ते रात्री आठ दरम्यान तिसरी पूजा केली जाते. यावेळेत विशिष्ट पध्दतीची कुची, साडी, दोन नारळाची ओटी, असंख्य रूद्राक्षमाळा, बाजूस
तिर्थाचा कलश, चांदीचा दंड अशा स्वरूपात पूजा बांधली जाते.
या तिन्ही पुजेवेळी देवीच्या चेहऱ्यावर बाल्य, तरूण व वृध्द असा बदल होतो. सर्व पुजा मंत्रपठण, सनई, चौघडा, घंटानादाच्या निनादात मंगलमय वातावरणात पार पडतात. देवीच्या पूजेच्या मान पूर्वीपासून वीरशैव लिंगायत पुजाऱ्यांना आहे. पूजेसाठी फुले गुरव, वाजंत्री, सिंगाडी, कोळी आदी देवस्थानचे सेवेकरी
पुरवितात.
कार्तिक अमावस्येला यात्रा
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या श्री दानम्मा देवीची यात्रा दरवर्षी
कार्तिक अमावस्येस भरते. दानम्मा मातेची यात्रा म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच. श्री दानम्मा देवीची यात्रा पूर्वापार चालत आली आहे. कार्तिक अमावस्येपासून तीन दिवस देवीचा यात्रा उत्सव चालतो. कार्तिक महिन्यात जीवनातील अंध:कार नाहीसा व्हावा
यासाठी ज्ञानदिपाचा प्रतिक असणारा 'दीप' लावण्याची प्रथा आहे. येथील कार्तिक यात्रेदिवशी आलेले भाविक दीप लावून मोठ्या उत्साहात हा 'दीपोत्सव' साजरा करतात. यावेळी देवीची सेवा घडावी म्हणून भाविक देवीस अभिषेक घालतात शिवाय आपले नवस फेडतात. अनेक भक्त देवीस साडी-चोळी अर्पण
करतात तर काहीजण देवीची खणा-नारळाने ओटी भरतात. रूद्राभिषेक करण्याबरोबरच देवीस लोटांगण घालतात. सोलापूर, विजापूर, अक्कलकोट, गोकाक, बेळगाव, रायबाग, हुबळी, धारवाड, अथणी आदी भागातून भाविक मोठया संख्येने दरवर्षी यात्रेस चालत येतात. यात्रेबरोबरच दर महिन्याच्या अमावस्येला
चालत येणाऱ्या भाविकांचीही संख्या वाढली आहे.

No comments:
Post a Comment