Wednesday, May 27, 2020

जत वाचनालय:गौरवशाली परंपरा

आर्थिक चढउतार, युद्ध परिस्थिती, प्लेगची साथ, महागाई, उदासिनता, विरोधकांच्या कुरघोड्या या सर्वांवर यशस्वी मात करून जतच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला आहे, तो जत वाचनालयाने! तब्बल 135 वर्षे हा ज्ञानदीप अखंडपणे जळत असून आजपर्यंत लाखो वाचकांना ज्ञानाचा प्रकाश देण्याचे काम अविरत सुरूच आहे.

खंदे समर्थक व जिद्दी कार्यकऱयांच्या बळावर आजही ही संस्था यशस्वी वाटचाल करत आहे. इतर दीर्घायुष्यी संस्थेप्रमाणे याही संस्थेच्या वाटचालीत अनेक अडथळे आले,पण या सर्व अडथळ्यांवर सहज मात केली. पूर्वीच्या कार्यकर्त्यांच्या ,हितचिंतकाच्या जिददीचे ,कार्यकुशलतेने व श्रमाचे प्रतीक म्हणजे 'जत वाचनालय'! सध्या 135 वर्षांची वाटचाल करणाऱ्या या वाचन संस्कृती च्या थोडक्यात आढावा....
जत वाचनालयाची स्थापना इ.स.1885 साली झाली. त्यावेळचे संस्थानचे एडमिनिस्ट्रेटर रावबहादूर मुळे हे संस्थेच्या संस्थापकांपैकी एक होय. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रथमपासून धुरा संभालली. संस्था स्थापन करतेवेळी अन्य कोण होते याची कोठेच नोंद नसल्याने आजही अनेक नावे अनभिज्ञ आहेत. सुरवातीची सात वर्षे वाचनालयास अनंत अडचणीला तोंड द्यावे लागले. आर्थिक गणित बसत नसल्याने ०३ जानेवारी १८९२ साली मराठी शाळेत डॉक्टर, वकील, शिक्षक, व्यापारी व वाचनप्रेमी नागरिकांची सभा घेण्यात आली. या समेत चर्चेबरोबरच वादही रंगला पण अखेर संस्थेचे हित व गरज लक्षात घेवून सर्वानुमते कमिटी नियुक्त करण्यात आली व सर्व कारभार कमिटीकडे सोपविण्यात आला.
प्रथमपासूनच वाचनालयाचा कारभार पाहणारे रावसाहेब मुळे यांच्याकडे अध्यक्षपदाची सुत्रे तर तत्कालिन न्यायाधीश सिताराम नारायण खरे यांच्याकडे सर्वानुमते सुत्रे सोपविण्यात आली. कमिटीत ॲड. गोपाळ बल्याळ दामले, हॉस्पिटल असिस्टंट अमृत तात्या ताटे, अँड. कृष्णाजी रामचंद्र पाठक, बिडेश यशवंत पोतनीस, बामन बालकृष्ण लेले, भिकाजी नारायण गाडगीळ यांचा समावेश होता.
राजमान्यता
वाचनालयास राज्यमान्यता मिळणे आवश्यक होते. सुदैवाने राज्यमान्यताही लवकरच मिळाली. जतच्या डफळे संस्थानाकडून जत वाचनालयास वार्षिक ५० रूपये अनुदान मंजूर करण्यात आले. संस्थेने १८९३ साली 'धर्मसिंधू' व 'महाभारत' यासह अन्य नवीन पुस्तकाची भर घालत ग्रंथभांडार संपन्न करण्याकडेभर दिला. वाढत्या वाचक संख्येमुळे फर्निचरची उणीव जाणवू लागली. १८९७ साली बाचनालयासाठी देवदारी कपाट बाचनालयाच्या फंडातून घेण्यात आले. त्या कपाटाची किंमत तीन ते चार आणे होती. वाचनालयासाठी डफळे सरकारांनी खाजगीतून १ मोठे राऊंड टेबल, एक चौकोनी टेबल, दोन बाके देणगी दाखल दिली. प्रगतीचे पहिले पाऊल १६ जानेवारी १८९८ साली जी सर्वसाधारण सभा झाली. त्यात १९२ रूपयाचे बजेट मंजूर करण्यात आले. वाचनालयाची रोख शिलकी रक्कम सोने गहाण घेवून व्याजी लावावी व इतर रक्कम कचेरीतील सरकारी खजिन्यात ठेवावी असे एकमताने ठरले. यावर्षी सरकारी अनुदान ४२ रूपये मिळाले होते. १६ जानेवारी
१८९८ ची ही जनरल सभा प्रगतीचे पहिले पाऊल ठरले. १९०१ साली संस्थेचा पहिला पगारी सेवक नेमण्यात आला. १८९४ पासून वाचनालयाच्या सभासदांची दरवर्षी सर्वसाधारण सभा घेण्यात येवू लागली. स्वतःची इमारत १९०८ साली हिंदुपंच, काळ, भाला, स्वराज, हिंदू, बंदे मातरम्, अमृत बझार पत्रिका, इंदू प्रकाश, आनंद व ज्ञानप्रकाश या नियतकालिकेसह बेळगाव समाचार व त्याचबरोबर मुंबई गॅझेटची प्रत वाचकांना उपलब्ध करून देण्यात आली. १९१४ मध्ये लायब्ररीचे नियम तयार करण्यात आले. व याच वर्षी वाचनालयाने स्वत:च्या मालकीच्या इमारतीत प्रवेश केला. १४ वर्ष जमा केलेल्या पैशातून इमारतीची बांधणी करण्यात आली होती. व १९१५ साली कर्मचारी नियुक्त करण्यात आले. वाचनालयाची चढती कमान
आर्थिक घडी बसल्यानंतर फर्निचरच्या खरेदीकडे अधिक लक्ष देण्यात आले. १९१७ साली २५ रूपयांच्या खुर्त्यांची खरेदी करण्यात आली. यासाली बजेट ३३० रूपयाचे होते. १९१८ साली वर्तमानपत्र, नियतकालिका व पुस्तकात वाढ करण्यात आली. पुर्वीच्या वर्तमानपत्रा बरोबरच डेलीक्रॉनिकल, संदेश,
व्यंकटेश समाचार, सुबोध पत्रिका ही दैनिके, चित्रमय, जगत, उद्यान, लोक शिक्षण, मनोरंजन, भारत सेवक, नवयुग मासिक सुरू करण्यात आले. लायब्ररीच्या उपयोगासाठी २५ रूपयाचे एक घडयाळ खरेदी करण्यात आले.
प्लेग ने बिघडवले गणीत
१९३२ साली जत भागात प्लेगची साथ सुरू झाली.
नाईलाजाने सहा महिने वाचनालय बंद ठेवावे लागले. वाचनालय बंद असल्याने आर्थिक अडचणीत भर पडली. १९३३ मध्ये पुन्हा वाचनालय सुरू करण्यात आले पण १९३८ पर्यंत हीच परिस्थिती होती. वाचनालयाचा पहिला वाढदिवस वाचनालयाचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रघात १७ मार्च
१९४० साली सुरू झाला. यापुर्वी वाचनालयाचा ५० वर्षाच्या वाटचालीत वाढदिवस कधीच साजरा करण्यात आला नव्हता. वाचनालयाच्या वाटचालीत ५० व्या वाढदिवशी संपन्न झालेल्या या कार्यक्रमास तत्कालिन तत्वचिंतक, तर्कशास्त्राचे गाढे अभ्यासक तथा सांगली विलिंग्डन कॉलेजचे प्रोफेसर डी. डी. वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महिला वाचकांसाठी आग्रही भुमिका १९४० साली संस्थेचे बजेट ९१७ रूपये होते. यावेळी झालेल्या जनरल मिंटीगमध्ये महिला वाचकांसाठी व्यवस्था करावी असा ठराव पाठिंब्यासह श्री. वाळूजकर यांनी मांडला. तो ठराव एकमताने संमत करण्यात आला. याच सभेत शालेय विद्यार्थ्यांना एक आणा वर्गणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९४० हे वर्ष वाचनालयासाठी मैलाचा दगड ठरला.
युध्द परिस्थितीशी लढा आर्थिक परिस्थिती व प्लेगशी लढा देण्याबरोबरच युध्द परिस्थितीशी वाचनालयांनी यशस्वीपणे लढा दिला आहे. युध्द परिस्थितीत महागाईचा आगडोंब उसळल्याने वर्तमानपत्रासह नियतकालिका व पुस्तकांच्या किंमती वाढल्या १९४३ साली तीन साप्ताहिक व १४८१ ग्रंथ वाचनालयात होते.
हिरकमहोत्सवी वर्ष १९४५ साली संस्थेस ६० वर्ष पूर्ण झाल्याने हिरकमहोत्सवी वर्ष उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी बजेट २२०० रूपये होते. हिरकमहोत्सवी वर्ष पार पडल्यानंतर संस्थेला इमारती बद्दलच्या वादाला तोंड द्यावे लागले. १७ जून १९५० रोजी मुंबई सरकारने इमारतीवर दावा केला होता. सदर इमारतीवर आपला 'हक्क वाचनालयाने १९५५ मध्ये सिध्द केला व इमारतीचा पुन्हा कब्जा घेतला. तालुका वाचनालयाचा दर्जा जतच्या या जुन्या वाचनालयास असिस्टंट क्युरेटर ऑफ लायब्ररीजने 'तालुका वाचनालय' दर्जा दिला. व त्यानंतर नियमाप्रमाणे ३९ कलमाची घटना मंजूर करण्यात आली. यापुढील काळात वाचनालयाची वाटचाल वेगाने वाचनालयासाठी योगदान जतच्या वाचनालयासाठी समाजातील सर्वच घटकांनी हातभार लावल्यानेच आजही ही संस्था भक्कमपणे यशस्वी वाटचाल करत आहे. संस्थानाधिपती डफळे घराण्याबरोबरच राजकुमार, दिवाण, आनंदराव उर्फ बाबुराव खानविलकर, जे. के. देशपांडे, के. बी.
पोतनीस, व्ही. एच. हवालदार, जी. एस. कलमडीकर, बी. बी. शेख, आर. एन. बोर्गीकर, टी. जी. दुगांणी, रामभाऊ बोर्गीकर, आर. आर. देशपांडे, एस. जे. देशपांडे, बी. एस. देसाई, आर. एन. वाळुजकर, बी. एस. देसाई, एस. ए. कुलकर्णी, बी. एन. तेरवाडकर, एम. एल. कटकटी, भगवंत रामचंद्र तिल्याळकर,
फौजदार चिटणीस, वी. रा. जोग (११ वर्ष अध्यक्ष) यांचे
योगदान न विसरण्यासारखे आहे.
वाचनालयाचे १३५ वर्ष
अनंत अडचणीवर मात करीत जतच्या वाचनालयाने १३५ गाठली आहे. सध्या ग्रंथालय व वाचनालयास वर्ग तालुका वाचनालयाचा दर्जा दिला असून आजघडीला सभासदांची संख्या ३०४ हून अधिक आहे. वाचनालयात २३ हजार ३८३ पुस्तके, १४ दैनिके, ९ साप्ताहिक, १७ मासिक नियमित आहेत. ग्रंथालयाच्या वतीने ज्या स्पर्धा परीक्षा, व्यवसाय मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले त्याचा फायदा दुष्काळी जत तालुक्याला झाला. आजघडीला ३ पीएसआय, १० ग्रामसेवक, ८५ पोलीस भरती झाले आहेत. हे वाचनालयाचेच यश असल्याचे ते मानतात. वाचनालयास महाराष्ट्रातील अनेक नामवंत साहित्यिक, कवी, राजकारणी मंडळीनी भेट दिली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आण्णा हजारे, जयंत पाटील, भीमराव कुलकर्णी, दादासाहेब मोरे, शंकर पाटील, विठ्ठल वाघ भालचंद्र फडके, पु. ल. गावडे, निबांळकर साहेब, म. वा. बहिरे, म. द. हातकणंगलेकर, बा. ह. साळुखे, बा. ह. कहयाणकर, कवी सुंधाशू, विश्वास पाटील, शिवाजी सावंत,
भाई वैद्य, शरद पाटील, अनिल नाईक यांचा समावेश आहे.
तालुक्यात ३२ वाचनालये
जत तालुक्यात सध्या ३२ वाचनालये असून यातील तालुका वाचनालयाचा दर्जा जत वाचनालयास आहे. ३२ पैकी चार वाचनालये ब वर्गात तर अन्य वाचनालये क व ड वर्गात वाटचाल करीत आहेत.

No comments:

Post a Comment