Monday, May 25, 2020

जत शहरातील मंदिरे

जत शहराला मोठी धार्मिक परंपरा लाभलेली आहे. संस्थान काळापासून आजतागायत जतची यल्लम्मा यात्रा भरते. डोंगरावरील अंबाबाईचे मंदिर भक्तांचे लक्ष वेधून घेते तर जत शहराच्या मध्यभागी असलेला जतच्या चिनगीबाबांचा दर्गा व त्यांच्या बाजूला असलेले १०० वर्षापूर्वीचे राम मंदिरात आजही भाविकांनी फुललेले असते. भीमाने स्थापन केलेले बकेश्वर मंदिर हे जतच्या वैभवात भरच घालत आहे.

जतचे चिनगीबाबा जतचे ग्रामदैवत म्हणून चिनगीबाबांना ओळखले जाते. डफळे घराण्याचे हे दैवत आहे. जतच्या जुन्या राजवाडयात प्रवेश द्वाराजवळ बाबांचा दर्गा आहे. चिनगीबाबांच्या पांढरीत खोट चालत नाही. चिनगीबाबा हे मुस्लिम संत असले तरी आज जतच्या सर्वधर्मीयाचे श्रध्दास्थान आहेत. गुरूवारचा दिवस मुख्य दिवसआहे. तेराव्या शतकात विजापूर येथे चिनगीबाबा नावाचे एक थोर अवलिया होवून गेले. प्रचंड दैवी सामर्थ्य लाभलेले चिनगीबाबा एक साक्षात्कारी पुरूष होते. विजापूर शहराच्या पश्चिमेला अफजलपूर परिसरात चिनगीबाबांका तक्कीया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी बाबांचे वास्तव होते. आदिलशाही सरदार अफजलखाना बाबतची घटना लोक आजही सांगतात. विजापूर येथे अफजलखान ज्या ठिकाणी वास्तव करून होता त्याच्या पुर्वेस काही अंतरावर चिनगीबाबांचे वास्तव होते. अफजलखान जेव्हा छत्रपती शिवाजीराजांचा बंदोबस्त करण्यासाठी विडा उचलून स्वारीवर निघाला होता तेव्हा तो आशीर्वाद मागण्यासाठी बाबांच्या दरबारात गेला त्याने बाबांकडे विजयश्रीचा आशीर्वाद मागितला तेव्हा बाबांनी हसून 'मला फक्त तुझे घड दिसत आहे शिर कुठेच दिसत नाही' असे सांगितले. अफजलखानाला स्वारीस जाण्यापुर्वीच छत्रपतीच्या हातून मरण येईल, असे भाकित चिनगीबाबा यांनी सांगितले होते.
अफजलखानास बाबांचा आशीर्वाद समजला होता. युध्दात आपला मृत्यू होणार याची त्याला कल्पना आली. स्वारीवर निघण्यापुर्वीच त्याने आपल्या ६० बायकांना ठार करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार त्याने आपल्या ५९ बायकांना ठार करून त्यांच्या कबरी बांधल्या. एक पत्नी खानाच्या तावडीतून निसटली व चिनगीबाबांच्या आश्रयास गेली, त्यामुळे तिचे प्राण वाचले. ती पुढे बाबांची भक्त बनली. आजही विजापूर
येथे चिनगीबाबाका तक्कीया या बाबांच्या स्थानापासून काही अंतरावर साठ कबरी नावाची भव्य इमारत आहे. या ठिकाणी अफजलखानाच्या ६० बायकांच्या कबरी आहेत. त्यापैकी एक कबर आजही रिकामीच आहे.
चिनगीबाबांचे जतला स्थानक होण्यामागेही असाच एक साक्षात्कार सांगितला जातो. एकदा जतच्या डफळे संस्थानचे संस्थापक सटवाजीराजे डफळे आदिलशाहच्या आदेशावरून युध्दास निघाले असता चिनगीबाबांचा आशीर्वाद घेण्यास गेले तेव्हा बाबांनी आशीर्वाद दिला 'तु युध्दात विजयी होशील तुला राज्य मिळेल'. बाबांचा हा आशीर्वाद खरा ठरला. जत शह
सटवाजीराव यांचा पराक्रम पाहून आदिलशाहने त्यांना १६८१ मध्ये जत व करजगी प्रांताची जहागिरी तसेच जत, करजगी, व्हनवाड व बरडोल प्रांताचे देशमुखी वतन दिले. सटवाजीराव डफळे विजापूरहून परतताना बाबांच्या दरबारात गेले व त्यांना जतला येण्याची विनंती केली. तेव्हा बाबांनी आपल्या घोंगडीच्या दशा काढून दिल्या. हा माझा प्रसाद म्हणून जतन कर, असे सांगितले. सटवाजीराजे डफळे यांनी १७. व्या शतकात आपल्या राजवाडयात प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या बुरूजाजवळ आतील बाजुस चिनगीबाबांची प्रतिष्ठापना केली. तसेच आग्नेय दिशेच्या बुरूजावरून असलेल्या पांढऱ्या निशानावर बाबांनी दिलेल्या घोंगडया दश्या बांधल्या. आजही या निशाण्यावर बाबांच्या आशीर्वादाचे प्रतिक म्हणून घोंगडयाच्या काळया दश्या बांधल्या असतात.

डोंगरनिवासिनी अंबाबाई
जत तालुक्यातील भाविकांचे श्रध्दास्थान डोंगरनिवासिनी अंबाबाईचे मंदिर जतच्या दक्षिणेला तीन किलोमीटर अंतरावर तांबडया मातीच्या डोंगरावर आहे. अंबाबाईचा हा डोंगर सर्वाचेच नेहमी आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. पर्यटकांना आकर्षित करणारा हा डोंगर आहे. डोंगरावर निवासिनी अंबाबाईचे देऊळ असून आजुबाजुला घनदाट झाडी आहे. दरीखोऱ्यामुळे डोंगराच्या शोभेत वाढच झाली आहे. जतच्या डफळे घराण्यातील राजमातेने अंबाबाईच्या मंदिराची
प्रतिष्ठापना केली आहे. देवालयाची व्यवस्था श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळ पाहते. नवरात्र उत्सवाच्या निमित्त अंबाबाई देवालयात महालक्ष्मी दिवटी उत्सव, गोंधळी समाजाचा गोंधळ, महाअष्टमी, नवमी, उपवास, नवरात्र, घटस्थापना, विजयादशमी दसरा, सालंकृत पूजा, अभिषेक, पौर्णिमा, यात्रा, महाप्रसाद असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

जतचे राम मंदिर
जतच्या जुन्या राजवाडयात प्रवेश द्वाराजवळ चिनगीबाबांचा दर्गा आहे. या दर्याच्या उजव्या बाजूला संस्थानकालिन राम मंदिर आहे. या राम मंदिरासमोर बांधलेल्या सभा मंडपाला आज १२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या राम मंदिराचे बांधकाम डफळे घराण्यांनी केले आहे. रेखीव असे बांधकाम आहे. मंदिरातील मूर्ती या सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. महाभारत कालीन बंकेश्वर मंदिर जतचा हा परिसर महाभारतकालीन आहे असे अनेक पुरावे जतसह परिसरात मिळतात. जत शहराचे पूर्वीचे नाव 'जयंती' असे होते. येथेचे भिमाने नरबळीला चटावलेल्या बकासुराचा वध केला. एखादे अचाट, समाजहित उपयोगी विरकृत केले की त्याठिकाणी शंकराचे लिंग स्थापन करण्याची पूर्वी प्रथा होती त्याला अनुसरून भिमाने येथे लिंग स्थापन केले. त्याला त्याने 'बंकेश्वर' असे नाव दिले. भिमकायाने स्थापन केलेले हे लिंग महाभव्य असून मानवाच्या कवेत मावण्याजोगे नाही. एवढे मोठे शिवलिंग सहसा कोठेही आढळत नाही. त्यादृष्टीने बंकेश्वर हे जतचे खास वैशिष्ट मानावे लागेल.

No comments:

Post a Comment