जतपासून ११ किलोमीटरवर जत–सोलापूर मार्गावरील वळसंग येथे श्री. केंचराया यांचे भव्य मंदिर आहे. सात वाडया-वस्त्या एकत्रित करून वळसंग गावाची निर्मिती झाली असून ते कार्य सिध्दपुरुष जोगसिध्द यांनी केले आहे. वळसंग येथे श्री केंचराया प्रकट झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. कुर्म, मत्स्य, वराह, वामन, नरसिंह, वाम, परशुराम, कृष्ण, बौध्द व कलंकी हे अवतार संपल्यावर श्री विष्णूंनी क्षिरसागरात शयन केले. त्यानंतर विष्णूच्या इच्छेने हाल मताच्या ठाईत अवतार इच्छा होवून या हालमताच्या ठाईतील भक्ताकडून सेवा करून घेण्याच्या इच्छेने अवतार घेतल्याचे आख्यायिका सांगितली जाते.
आदी अनादी काळापासून ज्यावेळी पृथ्वी, आप, तेज, वायू हे पंचमहाभूत सर्वच जलमय होते. ज्यावेळी केशव नारायण म्हणजे मूळ संस्कृत शब्द नारा या शब्दाचा अर्थ निर म्हणजे
पाणी व आयन म्हणजे शयन म्हणजेच पाण्यावरती झोपलेला शेषशाही तो हा विष्णू अवतारी केशव नारायण म्हणजे केंचराया होय.
धनगर समाजाच्या भोळ्या भक्तीला प्रकट होवून केशव या शब्दाचे अपभ्रंष होवून केंचराया हे नाव प्रख्यात झाले. श्री केंचराया हे बळळोळ नारमधून नवलीहाळ येथे विधीवत स्नान करून बळगानूर येथे येवून मोठ्या प्रमाणात भक्तगण कमविले. नंतर केंचराया व जटींगराय यांची भेट झाली. पुढे थोड्याच अंतरावर भुतांचा झुंड आला. त्या झुंडीबरोबर घनघोर युध्द करून श्री केंचरायाने विजय मिळविला. कवलगी, आसंगी, कलमडी, जत मार्गे येवून वळसंगपासून काही अंतरावर ओढ्याच्या पलिकडे सांचीकरी म्हणजेच सालेकिरी नावाचे गाव आहे. या गावात येवून बारा वर्ष श्री. केंचराया राहिले. या गावात केंचरायाचे जुने मंदिर आहे. या देवाचे देवस्थान आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र या तिन्ही राज्यात आहे. शेवटी परमेश्वर वळसंग या गावी वीरभद्राशी
करार करून सालेकिरी सोडून वळसंग गावात ब्रम्हदेव मंदिराजवळ जोगसिध्द यांच्या भक्तीला वंश होवून स्थापन झाले. परंतु त्यावेळी काही वचननामा देवून जोगसिध्द बनामध्ये स्थापन झाले. त्यावेळेपासून दीपावली व गुढीपाडवा यावेळी श्री केंचराया, ब्रम्हदेव, जोगसिध्द यांचा पालखी भेट सोहळा होतो.
दुमजली इमारत व गादीस परवानगी नाही
वळसंग येथील केंचराया मंदिरात केलेली पूजा व घंटीचा आवाज सत्तर मीटरवर असणाऱ्या वीरभद्राच्या मंदिरात ऐकू येत नाही. परंतु मंदिराच्या पलीकडे तीन किलोमीटरवर असलेल्या संगतीर्थ येथे आवाज ऐकू येतो. संख तीर्थ हे स्थान स्कंदपुराणातील संकतीर्थ नावाने प्रसिध्द आहे. गावची वेस मूळत: पूर्वेकडे असते. परंतु वळसंगची वेस पश्चिमेस आहे. अनेक चमत्कारातून गावातील लोकांना आपले अवतार दाखवत गादी वापरण्यास परवानगी दिलेली नाही व दुमजली इमारत बांधण्यास मनाई केली आहे. या गावातील मुलगी कोणत्याही समाजाची असो तीन पिढ्या जावळाचा कार्यक्रम हा केंचरायाला देण्याचा मान आहे. वर्षातून दीपावली व गुढीपाडव्याला देवाची यात्रा भरते. यात्रेमध्ये दिपावलीला नरकचतुर्थी दिवशी भगवान श्री कृष्णाने नरकासूर या राक्षसाला मारून अनेक भक्तांचे रक्षण केले. स्थायी प्रतीक म्हणून नरकचतुर्थी दिवशी केशव म्हणजेच कृष्ण म्हणजेच केंचराया हा कृष्णा नदीच्या आंघोळीला जाण्याची पध्दतही कलियुगाच्या प्रारंभी सुरू झालेला असून आजही तो अखंडपणे सुरू आहे. नदीहून आल्यानंतर पाडव्यादिवशी ब्रम्हदेव व जोगसिध्द यांची पालखी भेट होते व केंचराया पालखी ही ब्रम्हदेवाच्या बनात जावून येते व अनेक भक्त
लोक आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पहाटे दंडवताचे नवस बोलतात व ते दंडवत घालतात. श्री कृपाळू परमेश्वर नवसाला पावतो.

No comments:
Post a Comment