जत तालुक्यातील कराजगी येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या जुनेदी बाबांच्या दर्ग्यास सहाशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. जुनेदी बाबा हे धर्मप्रसारासाठी भारतात आले होते. हा अतिशय जुना दर्गा असून तो आदिलशहाच्या काळातील असल्याचे सांगण्यात येते. या दर्ग्याविषयी आणि जुनेदी बाबांच्या इतिहासाचे आज संशोधन होणे आवश्यक आहे.
जतपासून पूर्वेला ४५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या करजगी या गावात पूर्वी मोठ्या प्रमाणात करंजी झाडांचे घनदाट जंगल होते. या जंगलावरूनच या गावाचे नाव करजगी पडले ,असे सांगितले जाते. गावाच्या दक्षिणेला सुमारे पाच एकराच्या परिसरात करजगीकरांचे आराध्य दैवत असणाऱ्या जुनेदी बाबांचे आकर्षक असा प्राचीन दर्गा आहे. दर्याचा घुमट सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. दर गुरूवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते.
मुंबई, पुणे, बेंगलोर, कुडची, विजापूर, सांगली, अथणी आदी भागातून जुनेदीबाबांचे भक्त करजगीत येतात. करजगीकरांबरोबरच कर्नाटकातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान बनलेल्या या देवस्थानाविषयी असे सांगितले जाते की, सुमारे सहाशे वर्षापूर्वी शेख अहमद बेमारू मगदुम बुजुर्ग जुनेदी बाबा हे न्यूयॉर्कमधून जुनेद जि. बगदाद येथून धर्मप्रसार व समाजकार्यासाठी हिंदुस्थानात आले. धर्मप्रसार करीत दिल्ली येथे आले असता, त्यांचा दिल्लीचे राजे तुगलक यांची मुलगी राणी ताजीबी साहेबां यांच्याशी विवाह झाला. पुढे दिल्ली येथून दक्षिण हिंदुस्थानात धर्मप्रसारासाठी आपल्या लवाजम्यासह निघाले. असाच धर्मप्रसार करीत गुलबर्गा, विजापूर या भागातून खिळेगांव येथे आले. खिळेगांव येथे बाबांनी काही चमत्कार केले. नंतर संख ता. जत येथेही त्यांनी दैवी चमत्कार केल्याने त्यावेळचे राजे चाणक्य यांनी त्यांना पंचहत्तर एकर जागा ईनाम दिली, ती आजही आहे. त्यानंतर जुनेदी बाबांचा ताफा करजगी येथे आल्यानंतर तेथे त्यांच्या शिखराच्या कुत्र्यामागे ससा लागला.त्यामुळे काहीतरी विचित्र प्रकार आहे. त्यामुळे आता आपला धर्मप्रसाराचा प्रवास थांबवला पाहिजे, असे संकेत घेवून संत जुनेदी हे करजगी येथे स्थायिक झाले. आणि इथूनच त्यांनी धर्मसार व भक्तीमार्गाचे कार्य चालू केले. विजापूर येथील प्रसिध्द व्यापारी मोतीवाला हा संत जुनेदी यांचा निस्सीम भक्त होता. हा व्यापारी हिरे, माणिक, मोती, सोने घेवून व्यापारासाठी परदेशी जात असताना समुद्रात आलेल्या वादळाने व्यापारी मरण पावले. पण जुनेदी बाबांना त्याचा दृष्टांत होताच त्यांनी त्याला वाचविले. पुढे तीस वर्षांनी बाबाकडे आला. पण तत्पूर्वी बाबांचा मृत्यू झाला होता. तेंव्हा त्यांच्या समाधीच्या ठिकाणी आदिलशाह व व्यापारी या दोघांनी मिळून जुनेदी बाबांचे मंदिर बांधले. दक्षिणेकडे तोंड करून असणाऱ्या मंदिरावर मोठे घुमट, नगारखाने, दोन चार कबरी पाहवयास मिळतात. त्याला सहाशे वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.
१२५ तुर्की लोकांची घरे
बाबांबरोबर आलेले त्यांच्या तुर्की वंशजांची सुमारे १२५
घरे आहेत. आता ती बिराजदार, बिरादार, पटेल, मुजावर, जुनेदी या नावांनी ती ओळखली जातात. दरवर्षी एप्रिल महिन्यात मोठा उरूस साजरा केला जातो. हा उत्सव हिंदू व मुस्लीम समाज मिळून मोठ्या आनंदात साजरा करतात.
मलकारसिध्दाची भेट
करजगीचा दर्गा खूपच प्रसिध्द आहे. हा दर्गा आसमंतात चाळीस मैलांच्या परिसरात उठून दिसतो. येथे एक छोटे देऊळही आहे. येथे उमदीचे श्री मलकारसिध्द देवाची पालखी दरवर्षी येते, असे सांगतात. या छोट्या देवळात पालखी व लोक जाताना सहजपणे जातात. परंतु परत येताना पालखी
निघेनासी होते. म्हणून तिचे स्क्रु व मोळे काढून ती मोडून बाहेर काढतात व पुन्हा जोडतात. मलकारसिध्द दर्गा पिराला भेटावयास येतात व नाखुषीने बाहेर पडतात असा या घटनेचा अर्थ लावला जातो.

No comments:
Post a Comment