शुद्ध शाकाहारी बनाळी
जतपासून अवघ्या 10-11 किलोमीटर अंतरावर असणारं बनाळी गाव. 40 एकर जमिनीवरील झाडीत हे गाव वसलेलं आहे. हे बनशंकरी देवीचं जागृत देवस्थान. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे गावात मांसाहार करणारा कोणी शोधूनही सापडत नाही. कारण कोणी मांसाहार केलेला येथील देवीला चालत नाही. जर तो कोणी केला तर त्याच्यावर येथील मधमाशा हल्ला चढवितात,असं सांगितलं जातं. गावात जाणारा पाहुणा असला तरी तो यातून सुटत नाही. अशा अनेक घटना गावात घडल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे भितीपोटी गावात कुणीही मांसाहार करत नाही. शिवाय मांसाहार करून कोणी गावाच्या शिवारात पाऊल ठेवत नाही. शिवाय गावात होणारा नवरात्र उत्सव खूप मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. नवरात्रीच्या पहिल्या तीन दिवसात गावातील लोक कडकडीत उपवास करतात या दिवसात हे लोक साधं पाणीही पीत नाहीत.
चिनगीबाबापेक्षा कोणीही मोठा नाही
चिनगीबाबा हे जत नगरीचे दैवत आहेत. बाबा नवसाला पावतात, असे सांगितले जाते. जत शहरातील जुन्या राजवाड्यात दक्षिण बाजूला चिनगीबाबा यांचा दर्गा आहे. अफजल खान स्वारीला जाण्यापूर्वी शिवरायांच्या हातून त्याला मरण येईल असं भाकीत चिनगीबाबांनी केलं होतं असं सांगितलं होतं. चिनगीबाबा हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक मानले जातात. येथील दर्ग्यावर असणाऱ्या झेंड्यापेक्षा उंच इमारत कोणीही बांधत नाही. एकाने लाखो रुपये खर्चून ती बांधली मात्र पुन्हा ती पडली, असं येथील नागरिक सांगतात.
एकमजली वळसंग
जतपासून पूर्वेला दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वळसंग गावात दोन मजली घर कुठेही पाहायला मिळत नाही. कारण दोन मजली घर बांधलं की ते पडतं, असा येथील लोकांचा समज आहे. त्यामुळे ते बांधण्याच्या फन्दात कोण पडत नाही. याचा संबंध गावातील ग्रामदेवतेशी असल्याचे लोक सांगतात. या गावातील देव गादीवर बसला असल्या कारणाने गावात कोणीही गाडी वापरत नाही.
दूध न विकणारे काराजनगी
जतपासून जवळ असलेल्या काराजनगी या गावात बिसलसिद्धेश्वराचे जागृत देवस्थान आहे. गावात मोठ्या प्रमाणावर दुधाचे उत्पादन होतं. परंतु येथे दूध विकलं जात नाही. गेल्या कित्येक पिढ्यानपासून ही परंपरा या गावात आहे. दूध विकल्यास देवांचा कोप होतो, असा येथील लोकांचा समज आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काही तरुण मंडळींनी येथे दूध डेअरी सुरू केली,परंतु कोणीही दूध विकायला तयार नसल्याने ती बंद पडली. दुधाचा व्यवसाय केल्यामुळे दूध डेअरी बंद पडली आणि संबंधित तरुण आजारी पडले असे सांगितले जाते.

No comments:
Post a Comment