Monday, June 15, 2020

मांसासाठी प्रसिध्द माडग्याळी मेंढी

राज्यात मांसासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माडग्याळ’ मेंढीच्या संवर्धनासाठी तिचे उगमस्थान असलेल्या सांगली जिल्ह्यातील माडग्याळ (ता. जत) गावात संशोधन व संवर्धन केंद्र स्थापन करण्याची गरज आहे. देशातील अधिक मांस उत्पादन देणाऱ्या मेंढ्यांच्या जातींपैकी ‘माडग्याळ’ ही जात आहे. त्यामुळे ‘माडग्याळ’चे संगोपन व संवर्धन केल्यास राज्यातील मांस उत्पादनात वाढ होऊन निर्यातीस चालना मिळेल, असा हेतू आहे.

भारत वगळता इतर बहुतांश देशांमध्ये दैनंदिन आहारात शेळीच्या मांसापेक्षा मेंढी मांसाचे अधिक सेवन केले जाते. ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, तुर्की, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व चीन आदी देशांमध्ये भारतातून मेंढीचे मांस निर्यात करण्यास मोठा वाव आहे. त्यातच राज्यातील मेंढ्यांची संख्या सातत्याने घटत चालल्याने कत्तलीसाठी पुरेशा प्रमाणात मेंढ्या उपलब्ध होत नाहीत. परिणामी, मेंढी मांसाच्या निर्यातीतही घट होत आहे. तसेच, राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी होत असल्याने बीफची उपलब्धता कमी होत आहे. ही कमतरता मेंढी मांसातून काही अंशी भरून काढता येऊ शकेल.
देशपातळीवर माडग्याळ, मारवाडी, जैसलमेरी या मेढ्यांच्या जाती प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. तर, राज्यात प्रामुख्याने दख्खनी, माडग्याळसह काही गावठी मेंढ्यांच्या जाती आहेत. यापैकी माडग्याळ ही मेंढी जात मांसासाठी प्रसिद्ध असून, ही जात काटक आहे. इतर मेंढ्यांच्या तुलनेत अधिक रोगप्रतिकारक आहे. माडग्याळ नराचे वजन सर्वसाधारण ४० ते ५० किलो, तर मादीचे वजन ३५ ते ४० किलो इतके असते. त्यामुळे देशातील अधिक मांस उत्पादन देणाऱ्या मेंढ्यांच्या जातींपैकी माडग्याळ ही जात प्रमुख मानली जाते.
उष्ण तापमान, अवर्षणप्रवण क्षेत्र, वारंवार उद्भवणाऱ्या चाराटंचाई परिस्थितीत गाई, म्हैस व शेळ्यांच्या तुलनेत प्रतिकूल वातावरणात तग धरणारा मेंढी हा एकमेव प्राणी आहे. मेंढीमध्ये गाय, म्हैस व शेळीच्या तुलनेत कमी प्रतीच्या चाऱ्याचे सेवन करून त्याचे मांसात रूपांतर करण्याची क्षमता जास्त असते. तसेच मेंढ्यांच्या कातडी व लोकरीपासून तयार होणाऱ्या साहित्याच्या उद्योगाला चालना मिळेल आणि लेंडी खताचा उपयुक्त सेंद्रिय खत म्हणूनसुद्धा वापर करता येईल, त्यामुळे आर्थिक अडीअडचणीत तातडीने उत्पन्न देणारे मेंढीपालन इतर कोणत्याही पशुपालन व्यवसायाच्या तुलनेत किफायतशीर विशेषतः दुष्काळी शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न देऊ शकते.

No comments:

Post a Comment