मराठी समीक्षेतील एक बलदंड नाव म्हणजे डॉक्टर भीमराव कुलकर्णी हे होय. ते आपल्या जतचे असल्यामुळे समस्त सांगली जिल्हयाला त्यांच्याबद्दल अत्यंत रास्त असा अभिमान आहे. प्रतिकुल परिस्थितीशी झगडत झगडत त्यांनी शिक्षण घेतले. जिद्दीच्या बळावर उच्चशिक्षण घेतले. पुण्यासारख्या
विद्यानगरीत अव्वल दर्जाचे व्यासंगी प्राध्यापक असा
लौकीक प्राप्त केला आणि वा. ल. कुलकर्णी, गो.
म. कुलकर्णी अशा दिग्गज समीक्षकांच्या पंक्तीत आपलेही मानाचे पान निर्माण केले. आणि हे जे सारे त्यांनी केले ते केवळ स्वबळावर साध्य केले म्हणून त्यांचे आजही अप्रूप वाटते. विद्यावाचस्पती भीमराव कुलकर्णी यांच्या अकाली निधनाचा त्यावेळी मराठी समीक्षा क्षेत्रावर मोठाच आघात झाला होता.
मराठी साहित्याच्या बरोबरीने महाराष्ट्र संस्कृती, संगीत, शास्त्रीय गायन हेही त्यांच्या तितक्याच आवडीचे व अभ्यासाचे विषय होते हेही आवर्जून नमूद केले पाहिजे. वाङमयाच्या विविध प्रकारात प्रचंड रूची असणाऱ्या भीमराव कुलकर्णी यांनी आपली अशी एक स्वतंत्र अभिरुची जोपासली होती व तीच त्यांची खासियत होती. मराठी कादंबरीबाबत त्यांनी लिहिलेला एक प्रदीर्घ असा लेख मराठीच्या अभ्यासकांना आजही संदर्भासाठी मोलाचा वाटत असतो. यावरून भीमरावांच्या लेखनाचे वजन लक्षात येण्यास हरकत नाही. ते स्वत: उत्तम संपादक होते. त्या काळात त्यांची अनेक वाङमयीन संपादने गाजलेली होती. कारण यातील प्रत्येक संपादनाला संदर्भ मुल्य प्राप्त झालेले होते. मुंबईच्या मराठा महासंघाच्या रौप्य महोत्सवी वर्षाप्रित्यर्थ त्यांनी संपादीत केलेला 'अस्मिता महाराष्ट्राची' हा अपूर्व ग्रंथ आजही तितकाच टवटवीत आणि मौलीक वाटतो आहे. कारण त्याच महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच क्षेत्रांच्या प्रगतीचा आलेख रेखाटण्यात आला असून तो त्यातील जाणकारांच्याकडून त्यांनी लिहून घेतलेला आहे. अभ्यासक म्हणून डॉ. भीमराव
कुलकर्णी है अत्यंत दीर्घायोगी होते. सारस्वताच्या क्षेत्रातील काही साकारावयाचे असेल तर त्याकरीता हवे ते आणि सदैव तयारी असे. त्यांचा पत्रव्यवहार पण तितकाच दांडगा होता असे असूनही भीमराव कुलकर्णी यांनी कधी कसले दावे केले नाहीत वा कशावर आपला म्हणून कधी कसला हक्क सांगितला नाही.
प्राध्यापक म्हणून आपले कार्य काय आहे ते त्यांना अगदी यथार्थपणे उमजलेले असल्याने 'चित्ती असो द्यावे समाधान' याच कृतार्थ भावनेने ते प्राप्त आयुष्यात वावरले. आणि बोलावणे आल्यावर निमूटपणे निघून गेले. मराठी सारस्वत आणि मराठी समीक्षा त्यांचे नित्य स्मरण करतच असते. जतला त्यांचा नेहमीच अभिमान वाटत आला आहे.

No comments:
Post a Comment