Saturday, June 6, 2020

डॉ.खोचीकर यांच्या संशोधनाला जागतिक संदर्भ कोषात स्थान

जत तालुक्याचे सुपुत्र असलेले डॉ.मकरंद खोचीकर यांनी मूत्राशयाशी संबंधित अवयवांना होणाऱ्या कर्करोगाविषयी केलेल्या संशोधन आणि उपचाराविषयक माहितीचा जागतिक पातळीवर मानाचा समाजाला जाणारा वैद्यकीय क्षेत्रातील 'सर्जरी कोअर प्रिन्सिपल प्रॅक्टिस' या संदर्भ कोष ग्रंथात समावेश करण्यात आला आहे. पनामा (अमेरिका), लंडन व दिल्ली येथे काही वर्षांपूर्वी या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. मूत्राशयाशी संबंधित अवयवांना होणाऱ्या कर्करोगाचे निदान व सर्जरीविषयक मूलभूत संशोधन ते गेली वीस वर्षे करत होते. आज ते सांगलीतील युरोलॉजिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत.

'सर्जरी कोअर प्रिन्सिपल प्रॅक्टिस ' या ग्रंथाचे संपादन जॉन कोर्सन व रॉबिन विल्यम्सन हे मान्यवर लेखक दर पाच वर्षांनी करत असतात. वैद्यक क्षेत्रातील सर्जरीविषयक संशोधन, उपचारपद्धती या विषयी या ग्रंथात माहिती असते. या ग्रंथात प्रसिद्ध होणाऱ्या संशोधनाला मोठा मान असतो. संशोधन आणि उपचाराला शास्त्रीय जोड हवी. त्याला जगातील त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांनी प्रमाणित केलेले हवे. त्यानंतरच संशोधनाला संदर्भ कोषात स्थान दिले जाते. सुमारे दोन हजार पाने असलेला हा ग्रंथ दोन खंड मध्ये प्रसिद्ध केला जातो. 20 वर्षाच्या अनुभवावर आधारित युरॉलॉजीवर तीन ग्रंथ प्रसिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये किडनी कॅन्सर, मूत्राशयाचा कॅन्सर आणि आडरीनॅलिन ग्रंथीचे कॅन्सर अशी या ग्रँथांची नावे असणार आहेत.
डॉ. खोचीकर हे जत येथील रामराव विद्यामंदिर हायस्कूलचे शिक्षक श्री. खोचीकर यांचे चिरंजीव आहेत.

No comments:

Post a Comment