समुद्र सपाटीपासून 917 मीटर उंचावर उगम पावणारी माणनदी 163 किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूर तालुक्यातल्या सरकोली गावाजवळ भिमानदीस मिळते. सरकोली गावाजवळ जिथे माण आणि भीमा यांचा मिलाफ घडतो ते ठिकाण समुद्र सपाटीपासून 416 मीटर उंचावर आहे.सातारा जिल्ह्यातील माण, दहिवडी, खटाव, कोरेगाव, फलटण व खंडाळा तालुक्यातील काही भाग, सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत या तालुक्यातील काही भाग, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा तालुका या माण नदीच्या खोऱ्यात येतात. इतिहासात या माण नदीच्या खोऱ्यातील प्रजा किती सुखी आणि समाधानी होती याचे दाखले मिळत असले तरी बदलत्या जगाच्या राहाटीने माणदेश कसा बदलत गेला, याचे स्वातंत्र्य पूर्व काळातले चित्रणही माडगूळकरांच्या 'बनगरवाडी' या साहित्यकृतीने केले आहे. ही माणसे आणि त्यांची गुण वैशिष्ट्ये पाहण्यासाठी व्यंकटेश माडगूळकरांचा 'माणदेशी माणसं' वाचली पाहिजेत.
स्वातंत्र्यानंतर काही काळ सातारा जिल्ह्यातला तालुका असणाऱ्या जतकरांना सांगली जिल्ह्याच्या निर्मितीनंतर सांगलीत समाविष्ट करण्यात आले. कर्नाटक राज्याच्या सीमेवरचा तालुका असणाऱ्या जतकरांनी स्वातंत्र्य पूर्व आक्रमणे बरीच सोसली आहेत. विजापूर पासून केवळ 30 ते 35 किलोमीटरवर तालुक्याची सीमा व स्वातंत्र्यपूर्व काळात विजापूरच्या आदिलशाहीची असणारी महाराष्ट्रावरची करडी नजर पाहता या भागातील जनता युध्दांना कशी सामोरी गेली असेल यांची कल्पना येवू शकते.
महाराष्ट्रातल्या शिवशाहीनंतर या तालुक्याच्या रक्षणाची आणि मोगली आक्रमणांना रोखण्याची जबाबदारी तत्कालिन मराठा सरदार डफळे यांच्यावर पडली. ब्रिटीशांच्या आगमानापर्यंत डफळे घराण्यातल्या सरदारांनी जतकरांची मोगली आक्रमणातून सुटका केलीच पण ब्रिटीश सत्तेच्या काळातही जतकर जनतेची आणि विकासाची कामे केली. पूर्वेला असणारे कर्नाटकातले विजापूर आणि पश्चिमेला असणारे कराड, सातारा, गुहागर ही व्यापारी शहरे जोडताना तो रस्ता शहरातून घालविल्याने विजापूर-सातारामार्गे होणाऱ्या व्यापारात जतकरांचाही सहभाग वाढला. त्याचप्रमाणे 'कानडाऊ विठ्ठला कर्नाटका' म्हणत कर्नाटकातून कानडी बांधवांची पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनाला जाणारी संख्या पाहून अथणी-पंढरपूर या रस्त्याची निर्मिती ब्रिटिश काळातच झाली. त्यासोबत तालुक्यातून काही बंधारे, छोटे छोटे रस्ते ,पिण्याच्या पाण्यासाठी गावागावातून विहिरी ,मंदिरांचा जीर्णोद्धार यासारखी अनेक कामे स्वातंत्र्य पूर्व काळात झाली. स्वातंत्र्यानंतर या प्रकारच्या कामाला अधिक गती येईल आणि स्वातंत्र्याच्या सुगंधासोबतच विकासाचा आस्वाद घेता येईल अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही.
ब्रिटिशांनी संस्थानिकांशी साधलेली जवळीक आणि काँग्रेसने संस्थान खालसा करण्याचे अवलंबले धोरण पाहता स्वातंत्र्यानंतर संस्थानिकांचा शासनास म्हणावा तितका सहभाग राहिला नाही. या उलट संस्थानिकांनी तर काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवली. देशात आणि राज्यात काँग्रेस पक्षाला स्वातंत्र मिळविण्यात आलेल्या यशाचे श्रेय घेवून सता स्थापन करण्यात भरभरून यश आले. मात्र या सत्तेतला वाटेकरी होण्याचे भाग्य जत संस्थानिकांना मिळाले नाही. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येवूनही त्यांना विरोधी बाकावरच बसावे लागले.
यानंतर बॅरिस्टर टी. के शेंडगे यांनी जत तालुक्याचे आमदार म्हणून नेतृत्व केले. उच्चशिक्षीत आणि प्रशासन कुशल आमदार म्हणून त्यांची कारर्कीद गाजली.तरी भुमिपुत्र नसल्याची टिका त्यांच्यावर झालीच, यानंतर अॅड. सोहणी, बामणे, उमाजीराव सनमडीकर, मधुकर कांबळे या भुमिपुत्रांना संधी मिळाली ती केवळ आरक्षणाच्या मुद्यावर. काँग्रेसला संस्थानिकांचा विरोध पाहून राज्यातील नेत्यांनी तालुका आरक्षित करून अधिकच दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळले होते. राज्यातील नेतृत्वात असणारी मराठीशाही व तालुक्यातून निवडून गेलेल्या भुमिपुत्राची मुजरेगिरीची पारंपारिक मानसिकता बघता या तालुक्यातून सक्षम राजकीय नेतृत्व विकसीत होवू शकले नाही. भुमिपुत्राच्या अकार्यक्षमतेला कंटाळलेल्या जतकरांनी मग सुरेश खाडे यांच्याकडे नेतृत्वाची पताका दिला. पण नेतृत्व हाती येताच त्यांना जत तालुक्याचे आरक्षण उठणार याची चाहूल लागली मग त्यांनी एक पाय जतमध्ये तर दुसरा मिरजेत ठेवत पाच वर्षे ढकलली. आरक्षण उठल्यानंतर या जनतेने भुमिपुत्राला नाकारून बॅरिस्टर टी. के. शेंडगे यांचे वारस प्रकाश शेंडगे नेतृत्व स्वीकारले. थोडक्यात जतकरांनी केलेले राजकीय नेतृत्वातील प्रयोग कितपत हितावह ठरले याचे पुनर्मुल्यांकन करणे आवश्यक आहे. केवळ मुल्यांकन करून चालणार नाही तर या मुल्यांकनातून घडा घेणे आवश्यक आहे. विलासराव जगताप आणि आता विक्रमसिंह सावंत या भूमिपुत्रांना संधी मिळाली आहे. आता पुढचे राजकारण कसे असेल ते पाहावे लागेल. एवढे मात्र खरे की, अन्य तालुक्याच्या मानाने मागास असलेल्या तालुक्याला प्रगतीची द्वारे मात्र खोलली गेली नाहीत.
भौगोलिकदृष्ट्या जत तालुका अवर्षण प्रवण भागात येत असून या तालुक्यातल्या जमिनीत लोहाचे प्रमाण अधिक असल्याने या मातीत पिके जितकी जोमाने वाढतात तितक्याच जोमाने मने आणि तणे वाढतात असा अनुभव येतो आहे. तालुक्याला नदीला सहवास केवळ कागदावरच असला तरी दहा वर्षांपूर्वी बोर नदीला आलेल्या महापुराने जतकरांना आश्चर्याचा धक्का बसला. माणनदीच्या खोऱ्यात असणाऱ्या भुभागातील आपण नदीकाठी राहतो याचा कधी प्रत्यय आलाच नाही. जत शहरातून जाणारी गंधर्व नदी जतकरांना कधी ही नदी आहे, असे वाटलेच नाही. उत्तरेकडून वाहणारी कोरडा नदी नावाप्रमाणे कोरडीच असते.
राज घराण्याची देवी म्हणून जतची यल्लम्मा, डोंगरनिवासी अंबाबाई, बनात राहणारी बनशंकरी, गुड्डापूरची थानम्मा, बिळूरचा काळ भैरव, वाळेखिंडीचा 'सिध्दनाथ, घोलेश्वरचा गैबीसाब या तालुक्यातील देव-देवतांसह सांगोला तालुक्यातील सोणंदचा मसोबा, आटपाडीतला खरसुंडीचा नाथबाबा, कवठेमहांकाळच्या आरेवाडीचा बिरोबा, बेळगाव जिल्ह्यातील चिंचणीची मायाक्का आदी शेजारच्या देवतांचीही कृपादृष्टी तालुक्यावर आहे.
मात्र अंगात येणे, जटा राखणे, कोंबडी, बकरी बळी देणे. देवदासी सोडणे. नवस करणे यासारख्या प्रकारासोबतच बुवाबाजीच्या अनेक प्रकाराने जनता त्रस्त असते. शिक्षणाचा अभाव आणि दारिद्र्यामुळे या प्रकारांना आळा घालण्यास अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे मुठभर कार्यकर्ते अपुरे पडत असून तालुक्यातील शिक्षित नव्या पिढीने कामात अग्रभागी राहायला हवे.
कर्नाटकच्या सीमेवरचा तालुका असल्याने कन्नड भाषेचा वापर आणि कन्नड भाषिकांचे प्रमाण मोठया प्रमाणात आहे. कर्नाटकांशी असणारे तालुक्याचे व्यापारी, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध पाहता भविष्यात तालुक्याची भाषा संपूर्ण मराठी होईल, असे चित्र दिसत नाही. त्यामुळे कन्नडला मराठीचा बाज आणि मराठीला कन्नडची फोडणी दिल्याप्रमाणे
भाषेची स्थिती आहे. नाही म्हणल्या तालुक्यातल्या पश्चिम आणि उत्तर भागात अस्सल ‘मांदेशी भाषेचा उपेग हुतूया' तालुक्याचा औद्योगिक विकास म्हणजे राज्यकारण्यांची घोषणाबाजी असून कोणताही नवा व मोठा उद्योग या तालुक्यात नाही. तालुक्यातील हवा द्राक्ष, डाळिंब, बोर, चिकू, पेरू, सीताफळ यासारख्या पिकांना पोषक असली तरी उत्पादनानंतर साठवणूक, प्रकिया किंवा विक्री व्यवस्थेत होणारी शेतकऱ्यांची हेळसांड पाहता या फळांना मोजकेच शेतकरी पिकविताना दिसतात. बहुसंख्य शेतकरी ज्वारी, बाजरी, मका या सारख्या पांरपारिक तर उडीद मूग, मटकी, हुडगा, तूर, आंबाडी, करडी यासारखे कडधान्य पिकवतात. कमी पावसावर टिकणाऱ्या कडधान्याचे देशी वाण तालुक्यात उत्तम असले तरी या कडधान्यांच्या उत्पनात वाढ होण्यासाठी आधुनिकता आणि बाजारभाव याचा अभाव दिसून येतो. तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरू पाहणारा साखर
कारखाना सभासदांनी शेअर्स भरण्यासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते संपविण्यापूर्वीच बंद पडला. नंतर तो जयंत पाटलांच्या कारखान्याने कवडीमोलाने विकत घेतला. नंतर त्यांनी एक हंगाम ऊसगाळप केला, पण पुढे ऊस नसल्याचे कारण सांगून कारखाना बंदच ठेवला. यापूर्वी खांडसरी नावांचा प्रकल्प किलोच्या भावाने विकलेल्या जतकरांनी पाहिला.
पशुधनाच्या बाबतीत जत तालुका समृध्द असून माणदेशी खिल्लार गाय आणि वळू याला संपूर्ण महाराष्ट्रातून वेगळी ओळख असली तरी आजच्या दूध उत्पन्न वाढीच्या या गायी मागे पडल्या. आज क्वचितच काही शेतकऱ्यांकडे गायी आहेत. याबाबत संशोधन आणि पैदास केंद्रे विकसित व्हायला हवीत.
या भागातील मेंढी आता माडग्याळ मेंढी नावाने ओळखली जावू लागली आहे. उस्मानाबादी शेळी, पंढरपुरी म्हशी ज्याप्रमाणे नावाजल्या त्याचप्रमाणे माडग्याळ मेंढीही वेगळी जात विकसित झाली असून या मेंढीच्या कोकरांचे जन्मत: वजन अडीच ते तीन किलो असल्याने कमीतकमी वयात वजनदार बकरे होत असल्याने मटणासाठी चांगलीच मागणी आहे. मात्र आजही नगावर होणारी बकरी आणि बोकडे यांची विक्री बंद होवून जिवंत मटणाची वजनदार विक्री व्हावी ही या भागातल्या शेळी-मेंढी उत्पादकांची जुनी मागणी पूर्ण झालेली नाही. याशिवाय बोकडाचे मटण चवदार असल्याने बोकडांनाही मोठी मागणी आहे,मात्र अजून यात वाढ व्हायला हवी आहे. व्यापारी कमी दराने बोकड खरेदी करतात आणि नफा मारतात. यासाठी तालुक्यात मटण प्रक्रिया उद्योग उभारल्यास इथल्या लोकांना याचा फायदा होईल.
धार्मिक व जातीय सलोख्यासाठी तालुक्याचा आदर्श घ्यावा अशी स्थिती येते आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्यभाव दुभंगल्याची उदाहरणे तालुक्यात कधीच घडली नाहीत पण आमच्या पण 'घर तिथं पर' या म्हणीप्रमाणे काही ठिकाणी गालबोट लावणाऱ्या घटना घडल्याही. त्यात मिश्यावर ताव मारणारी मराठीशाही जपणाऱ्या काही वाळेखिंडीकरांनी दलितांना मंदिर प्रवेश नाकारून सामाजिक समतेच्या काळात सनातनी मनोवृत्तीचे दर्शन घडविले.
संख व उमदीच्या पुराण काळातील अनेक आख्यायिका सांगत आहेत. बहिण-भावाच्या प्रेमात पडलेल्या अंतराने बहिणीचे वास्तव उमदीला झाले आणि गाव उमेदीने भरभराटीला आले म्हणून नाव पडले 'उमदी'. तर बहिणीने आपली अहवेलना केली म्हणून सगळीकडे आरडाओरड करणारा भाऊ पाहून लोक 'शंख' चा अपभ्रंश करून 'संख' म्हणू लागले. या आख्यायिका किती खऱ्या आणि किती खोट्या हे जरी माहित नसले तरी जतच्या इतिहासात अजरामर होतील यात शंका नाही. आजही संख, उमदी यांच्यातले राजकीय वैरत्व मात्र पराकोटीचेच आहे. नवा तालुका होण्यातला तो एक अडसरही जाणकार सांगताहेत. लिंगायत व धनगर समाजाचे संख्यात्मक बहुमत तालुक्यात असले तरी राजकीय पटलावर मराठेशाहीचीच पाऊले अधिक रूतलेली दिसताहेत. शैक्षणिक क्षेत्रात विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दोन-तीन शाखा आणि वाळवा तालुका बौध्द संघटनेची सोरडी शाखा, मराठा मंदिरचे रामराव विद्यामंदिर, आमदार शि.द. पाटील कन्या हायस्कूल यासारखी बोटावर मोजण्याइतकी शैक्षणिक संकुले सोडली तर बाकी सर्व शैक्षणिक संकुले तालुक्याच्या संस्था चालकांनीच चालविली असल्याचे दिसते. पैसा कमविण्याच्या हेतूने चालविलेली डी. एड्, बी. एड् महाविद्यालये सोडली तर व्यवसाय शिक्षणक्षेत्रात जत तालुका मागासलेलाच राहिला. काही मोजक्या संस्था चालकांनी व्यवसाय शिक्षणात आता उडी घेतली आहे. पण परकीय विद्यापीठाच्या आक्रमणांने संकटात सापडलेल्या भारतीय व्यावसायिक शिक्षणातील स्पर्धेत हे नवे संस्था चालक कसे तग धरतील? याचे उत्तर काळच देवू शकेल. मात्र दि फ्रेडस असोसिएशन जत, पिपल्स एज्युकेशन सोसायटी जत, श्री बनशंकरी शिक्षण प्रसारक मंडळ बनाळी, जत तालुका शिक्षण प्रसारक मंडळ जत, सिध्दनाथ शिक्षणप्रसारक मंडळ वाळेखिंडी, सिध्देश्वर शिक्षणप्रसारक मंडळ कोसारी, धावडवाडी एज्युकेशन सोसायटी धावडवाडी, अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ पेड, भारत शिक्षण संस्था, उटगी आदी संस्थांनी चालविलेल्या गावोगावची संस्कार केंद्रे तालुक्याच्या वैभवात मोलाची भर घालताना दिसतात.
मोठ्या शैक्षणिक संस्थातून जतला बदली होवून येणारा शिक्षक, मुख्याध्यापक किंवा प्राचार्य म्हणजे एक तर शिक्षा भोगणारा आरोपी अन्यथा प्रशिक्षणार्थी अगदी हीच अवस्था महसूल, पाटबंधारे, कृषी आणि पोलीस खात्यातून दिसते आहे. त्यामुळे बाहेरून येणारा जतच्या स्वस्ताईचे स्वच्छ, सुंदर हवेचे तोंड भरून कौतुक करतो पण मातीशी नाती सांगण्यात अपयशी ठरतो. राजे रामराव महाविद्यालयाचे एकेकाळचे प्राचार्य कै. शामराव चव्हाण, रामराव विद्या मंदिराचे मुख्याध्यापक कै. रा. बा. पाटील, जत पोलीस ठाण्यातील एकेकाळचे फौजदार शिवाजीराव रूपनूर, फ्रेंडस हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक डॉ. श्रीपाद जोशी, गटविकास अधिकारी अरुणा ईटाई, तत्कालिन आरोग्य अधिकारी हुलवान, प्रतिष्ठीत व्यापारी मल्लाप्पा मोगली, ३५ वर्षापूर्वी तिकोटाहून आलेले डॉ. देवानंद वाघ, यासारख्या तालुक्याबाहेरून आलेल्या आणि जतकरांच्या सेवेत स्वतःला हरवून बसल्याची उदाहरणे जतच्या इतिहासात अजरामर होतील,यात शंका नाही.

No comments:
Post a Comment