पूर्वी होती सुंदर वनराई
तिथे प्रकटली शाकंभरी आई!
महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या बनाळीच्या श्री बनशंकरी देवीचे मूळपीठ कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील बदामीजवळ चोलचगुड येथे आहे. देवीचे उपपीठ जत तालुक्यातील बनाळी येथे आहे. बनाळीतील हे मंदिर हेमाडपंथी असून हे मंदिर रामदेवराव यादव यांच्या कालखंडातील आहे. बनात वसलेले हे मंदिर अतिशय रमणीय ठिकाणी असून याठिकाणी गेल्यानंतर मन प्रसन्न होते.
बनशंकरी देवीबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. जत तालुक्यातील शेगाव व वाळेखिंडी येथील एक भटजी व दोन ब्राह्मण हे तिघे देवीचे भक्त होते. त्यांच्या परमभक्तीने प्रसन्न झालेल्या देवीने भक्तांच्या इच्छेखातर बदामीहून भक्तासमवेत शेगाव येथे येण्याचे मान्य केले. पण अट घातली की कोणीही मागे वळून पाहायचे नाही. भक्ताला सांगितल्याप्रमाणे देवी भक्ताच्या मागावून चालत येत होती. मजल-दरमजल करीत
तीनही भक्त शेगावकडे निघाले होते. बनाळी येथे आल्यानंतर भक्तांनी देवी खरोखरच आपल्या मागे येत आहे का पहावे अशी इच्छा झाली व त्यांनी मागे वळून पाहिले. भक्तांनी मागे वळून पाहताच वीज कडाडली व भक्तांच्या मागे येणारी देवी बनाळीतच थांबली. तेव्हापासून देवीचे वास्तव्य बनाळीत आहे.
जागृत देवस्थान म्हणून बनाळीच्या बनशंकरीला सर्वदूर
ओळखले जाते. देवीला कोणाताही मांसाहार चालत नसल्याने गावात कोणीही मांसाहार करत नाही संपुर्ण गाव शाकाहारी आहे एवढेच नव्हे तर मांसाहार करून देवीच्या आवारातसुध्दा कोणी प्रवेश करू शकत नाही. चुकून एखाद्याने प्रवेश केला तर तेथील मधमाशा आजही मांसाहार करणाऱ्या व्यक्तीवर तुटून पडतात.
नवरात्राच्या काळात बनाळीत विविध कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते. भाविक भक्तीभावाने नवरात्र साजरा करतात. घटस्थापना केल्यापासून ते तिसऱ्या दिवसाच्या रात्री देवी येथील पुजाऱ्याच्या स्वप्नात येवून भाकित करते त्यास 'रजा' असे म्हटले जाते. देवीने सांगितलेली रजा येथील पुजारी चौथ्या दिवशी सकाळी देवीने स्वप्नात सांगितलेले भाकित भक्तांना सांगतात.
भाकित सांगितल्यानंतर नवरात्र उपवासाची रजा संपवतो. म्हणजे इतक्या काळांपर्यंत या देवीचे नवरात्र केले जाते. पुढे राहिलेल्या नवरात्र काळात केवळ खारिक, खोबरे, लिंबू, नारळाचे पाणी यावरच त्यांचा फराळ चालतो. श्री बनशंकरी देवीच्या कृपेने नेहमी हिरवळीच्या वनराईच्या कुशीतील बनाळीचा परिसर सांगली जिल्हयातील नंदनवन म्हणून ओळखले जाते. श्री बनशंकरी देवीचा परिसर चारही बाजूंनीडोंगराच्या उंच-उंच कडा आणि मधोमध वनराईच्या कुशीतील श्री बनशंकरी देवीचे नयनरम्य मंदिर पूर्वेकडे तोंड करून उभे आहे. मुख्य मंदिर हेमाडपंथी आहे. तर मंदिरावर उंच असे शिखर आहे. या शिखरावर सोन्याचा कळस आहे. मंदिरासमोर एक विहीर असून, हा जीवंत पाण्याचा झरा समजला जातो. आजवर ही विहिर कधीही आटली नसून, देवीच्या चरणातून पाण्याचा एक झरा आला आहे. तो सतत पाझरत असतो. शिवाय याच गोड्या पाण्याचा उपयोग संपूर्ण गावकरी करतात. बाजूलाही एक पाण्याचा कुंड आहे. या कुंडातील पाण्यातून देवीचा फड शिंपला जातो. समोर दोन दगडी ज्योतमाळ आहे. मंदिरच्या बाजूला संस्थानकालीन तलाव आहे. आज हा तलाव मातीने भरला असून गावातील अनेकांच्या शेतजमिनी येथे आहेत. पूर्वी या तलावात संस्थानचे हत्ती पोहण्यास येत असत. मंदिराच्या बाजूचा पंचवीस एकराचा परिसर हिरवाईने नटला आहे. यात आंबा, चिंच, जांभूळ, नारळ, पिंपळ, वड, निलगिरी, रामफळ, सीताफळ अशा विविध वृक्षांनी फुलून गेलेल्या परिसरात मोर, लांडोर, ससे, लांडगे, कोल्हे असे प्राणी मोठया प्रमाणात वास्तव
करतात. येथील सर्व जमीन पाणस्थळ आहे हे विशेष!
पर्यटन विकासाला वाव
जिल्ह्यात निसर्गनिर्मित असे बनाळी हे एकमेव ठिकाण
आहे. या ठिकाणी राज्य शासनाने पर्यटन केंद्र म्हणून हा
परिसर विकसीत करण्याची गरज आहे. सध्या जिल्हा परिषद आणि राज्य शासनाकडून काही प्रमाणात निधी मिळाला आहे. परंतु येथे मोठया प्रमाणात विकासाला वाव आहे. हा विकास साधल्यास जत तालुक्याच्या वैभवात मोठी पडणार आहे.

No comments:
Post a Comment