श्री क्षेत्र गुड्डापूरपासून सात किलोमीटरवर असलेले तालुक्यातील संगतीर्थ हे पवित्र तीर्थस्थान आहे. हे स्थान श्री दानाम्मा व श्री सोमनाथ यांचा विवाह झालेले स्थळ म्हणून ओळखले जाते. हे संस्मरणीय तीर्थस्थान ठिकाण वळसंग ते सोरडी मार्गावर आहे. मानवाच्या कल्याणार्थ बाराव्या शतकात प्रत्यक्ष शिवपार्वतीने मानव स्वरूपात जन्म घेतला व विधी विधानानुसार प्रत्यक्ष शिवपार्वतीच्या म्हणजे सोमनाथ–दानम्माचा लग्नसोहळा येथे झाल्याची आख्यायिका आहे. श्री दानम्माचा जन्म कुंडलसंगम येथे झाला. सोमनाथांबरोबर त्यांचा विवाह निश्चित झाला.
त्यावेळी महाशरणी दानम्माच्या इच्छेनुसार संगतीर्थ
येथे ५५५ साली सामुदायिक विवाहसोहळा पार पडल्याचे सांगितले जाते. संगतीर्थ येथील मंदिरात समोरच्या बाजूस श्री दानम्माचे तर उजव्या बाजूस सोमनाथाचे अशी दोन मंदिरे शिवलिंगे आहेत. येथे छोटेसे मंदिर व मागील बाजूस ओवऱ्या होत्या.
पस्तीस वर्षापूर्वी मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला. मंदिरासमोर डाव्या बाजूस पुरातन पाण्याचे कुंड आहे. या कुंडाची खोली पाच फुट आहे. परंतु येथे बारमाही गोड पाणी असते. दुष्काळात पाणी कमी होते पण जितके काढेल तितके पाणी वाढते. ८०० वर्षापूर्वी देवीने सामुहिक विवाहाचे जे पाऊल उचलले ते आजही प्रेरणादायी आहे. समाजात
परिवर्तन घडविण्याचे काम श्री दानम्मा यांनी केले. कारण आजही प्रतिष्ठेचा विवाह करण्यातच धन्यता मानतात. भरमसाठ पैसा खर्च करणे हीच आजचीही दुर्दैवाने मानसिकता आहे. एवढेच नव्हे तर कर्ज काढून लग्न करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. पण देवीने सामूहिक विवाह सोहळा करून त्याकाळी एक चांगला पायंडा पाडला. आज सामुदायिक विवाहाची गरज लक्षात येते.

No comments:
Post a Comment