Tuesday, May 19, 2020

महाभारत कालीन मुचंडीचा श्री दरेश्वर




मुचंडी येथील श्री दरेश्वराचे मंदिर प्रसिध्द आहे.
महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातील भाविक याठिकाणी मोठ्या संख्येने येतात. श्री दरेश्वर देवामुळेच मुचंडी गावास महाभारतकालिन पौराणिक इतिहासही असल्याचे सांगितले जाते. पूर्वी येथे मुचकंदेश्वर ऋषींचा आश्रम होता. त्यामुळे या गावास मुचंडी असे नाव पडल्याचे सांगितले जाते. जत तालुक्यात मुचंडी येथील श्री दरेश्वराचे मंदिर प्रसिध्द आहे. महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातील भाविक याठिकाणी मोठ्या संख्येने दर्शनास येतात. श्री दरेश्वर देवामुळेच मुचंडी गावास महाभारतकालिन पौराणिक इतिहासही असल्याचे सांगितले जाते. पुर्वी येथे मुचकंदेश्वर ऋषींचा आश्रम होता त्यामुळे या
गावास मुचंडी असे नाव पडल्याचे सांगितले जाते.

दरेश्वराला श्री शंकराचा अवतार मानला जातो. याबाबतची एक आख्यायिका सांगितले जाते. दरेश्वर आपली बहिण अकम्मा व जकन्या हिला घेवून जात असताना आदिलशाही फौजेने त्यांचा पाठलाग सुरू केला तेव्हा नाईलाजाने दरेश्वरांनी जकन्याला डोंगराच्या दरीत ओढ्याकाठी उभा करून स्वत: डोंगरात प्रवेश केला, असे सांगितले जाते. दरेश्वराच्या मुख्य
मंदिरात सध्या घोड्याचा मागील एक पाय, शेपूट व दरेश्वरांची मांडीचा काही भागच दिसतो. इतर सर्व भाग डोंगरात घुसला आहे. याच ठिकाणी दरेश्वरांनी प्रवेश केल्याचे लोक सांगतात.
श्री दरेश्वरांनी ज्या ठिकाणी ओढयाकाठी जकव्वाला सोडले होते ती जागा मंदिराच्या समोरच आहे.
मुचंडीपासून पाच किलोमीटरवर पूर्वेला मुचंडी व कर्नाटक सरहद्दीवरील कनमडी येथे दरेश्वरांचे अतिशय सुंदर व विलोभनीय मंदिर आहे. श्री दरेश्वरांचे मंदिर बहामनी वास्तुशास्त्र पध्दतीने उभारण्यात आलेले आहे. मंदिराचे मुख्य वैशिष्ट म्हणजे खोल दरीच्या पायथ्यापासून उंच डोंगरावर उभारून समोर नजर टाकली की मंदिराचे जे मुख्य सौंदर्य आहे ते नजरेत भरते.
मुचंडीला महाभारतकालीन इतिहास आहे. महाभारत काळात भगवान श्रीकृष्णाचा कालयवन या राक्षसाने पाठलाग केला तेव्हा श्रीकृष्ण दक्षिणेत पळून आले व आश्रयासाठी  येथील मुचकंदेश्वर ऋषीच्या आश्रमात लपले. कालयवनला फसविण्यासाठी श्रीकृष्णांनी आपले पितांबर झोपी गेलेल्या ऋषीच्या अंगावर झाकले. पाठलाग करणारा कालयवन आश्रमात घुसला व पितांबर झाकून श्रीकृष्णच झोपेचे सोंग करत असल्याचे समजून त्याने श्रीकृष्णाला ठार मारण्याच्या
हेतूने पितांबराला जोरदार हिसडा मारला. त्याक्षणी ऋषींचा निद्रानाश झाला. संतप्त ऋषींनी कालयवन समोर पाहताच त्याला क्षणार्धात भस्मसात करून टाकल्याची आख्यायिका आहे.
काशीखंड या ग्रंथात त्याबद्दलचा उल्लेख आहे.
मुचंडीच्या उत्तरेला बोर नदीच्या काठी रामलिंगाचे मंदिर
आहे. त्यास मुचकंदेश्वर नावाने ओळखले जाते. याठिकाणी शेकडो वर्षापूर्वीचा एक मोठा वटवृक्ष असून पूर्वी याचठिकाणी मुचकंदेश्वर ऋषींचा आश्रम होता असे सांगितले जाते. गावामध्ये शंकरेश्वराचे एक मंदिर असून त्याची रचना बहामनी वास्तुशिल्प शैलीतील आहे. या मंदिराच्या आसपास अनेक जुन्या फुटक्या मूर्ती,शिवलिंगे, नंदी, चालुक्य शैलीतील अवशेष आढळतात.

No comments:

Post a Comment