ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. तालुक्यातील सर्वच बाबतीत प्रगत गाव म्हणून त्याची ख्याती आहे. जत संस्थानमधील उपराजधानी म्हणून गावाला ओळखले जाते. डफळापूरचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या गावात आजही हिंदू-मुस्लिम ऐक्य कायम आहे. दोन्ही समाजाचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. श्री बुवानंद हे मूळचे आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथील सुफी संत होते. धर्मप्रचार प्रसार करण्यासाठी निघालेले श्री बुवानंद हे मजल दरमजल करीत जत तालुक्यातील खलाटी येथील डोंगरावर आले.
अल्पावधीत ते लोकप्रिय झाले अनेक भक्त त्यांच्या दर्शनासाठी डोंगरावर गर्दी करू लागले.डफळापूरचे मुख्य वैशिष्ठ्य म्हणजे गावात आजही हिंदू-मुस्लिम ऐक्य आहे. दोन्ही समाजाचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. श्री बुवानंद हे मूळचे हैद्राबाद येथील सुफी संत. धर्मप्रचार प्रसारासाठी निघालेले बुवानंद खलाटी येथील डोंगरावर आले.
डोंगरावर जाणे-येणे लोकांना त्रासदायक होत असल्याने लोकांनी श्री बुवानंद यांना डफळापूर येथे येण्याची विनंती केली. भक्तांच्या विनंतीला मान देवून श्री बुवानंद डफळापूर येथे आले. डफळापूरच्या राजांनी त्यांना जागा दिली. पाचशे वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे. डफळापूरच्या राजांनी ज्या ठिकाणी त्यांना जागा दिली होती. त्याच ठिकाणी श्री बुवानंद यांची समाधी आहे. पूर्वी घुमट होते. घुमट कोसळल्यानंतर ग्रामस्थांनी पुढाकार घेवून बसस्थानकाजवळ दर्गा बांधला.
प्रारंभी प्रवेशद्वार, आतमध्ये दर्गा व त्यात बुवानंदाची समाधी आहे. श्री बुवानंदाचा घोडा राजांनी दिलेल्या राजवाड्यात असतो.
दर गुरूवारी घोड्याच्या अंगावर गलेफ घालून राजवाड्यापासून मिरवणुकीने दर्यापर्यंत आणले जाते. श्री बुवानंद यांचा ऊरूस प्रतिवर्षी हिंदू व मुस्लिम बांधव मिळून करतात हे विशेष !
No comments:
Post a Comment