जतच्या दक्षिणेला कर्नाटक सीमेवर प्रतापराव गुजर यांच्या लढाईने प्रसिद्धीस आलेले उमराणी गाव आहे. प्राचीन इतिहास असलेल्या या गावाला अनेक राजसत्तांचा वैभवशाली इतिहास लाभला आहे. उमराणी येथील प्राचीन मंदिरात इ.स. ११ व १२ व्या शतकातील काही प्राचीन शिलालेख आढळून येतात. यात कलचुरी घराण्यातील राजा बिज्जलदेव याने या मंदिरांना दान दिल्याची नोंद येते. पण शिवकाळात उमराणी प्रसिद्धीस आले ते येथे घडलेल्या प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमामुळे. इ.स. १६७३ साली राज्याभिषेकापूर्वी काही महिने महाराज पन्हाळगडावर असताना अदिलशाही सरदार अब्दुल करीम बहलोलखान हा बारा हजार स्वार घेऊन स्वराज्यावर चाल करुन आला. ही वार्ता समजताच महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांस खानावर रवाना केले. त्यांना आज्ञा दिली की “खान वलवल भारी करतो, त्यास मारोन फते करणे. महाराजांच्या आज्ञेनुसार प्रतापराव बहलोलखानावर चालून गेले. यावेळी बहलोलखानाचा मुक्काम कर्नाटक सीमेवर असलेल्या उमराणी गावाजवळील डोण नदीकिनारी होता. मराठ्यांनी सर्वप्रथम खानाचे पाणी तोडले व दुसऱ्या बाजूने त्यावर हल्ला केला. पाण्याशिवाय कासावीस झालेल्या खानाला शरण येण्याशिवाय पर्याय नव्हता. बेहलोलखानाने प्रतापराव व मराठा सैन्यासमोर शरणागती पत्करली. प्रतापरावांनी त्याला माफी दिली. शरण आलेला बहलोलखान मराठ्यांसमोर पराजीत होऊन मागे निघून गेला. हि बातमी महाराजांना कळल्यावर ते चिडले. महाराजांच्या आज्ञेचे पालन करण्यात प्रतापराव चुकले होते. बहलोलखान पराभवाचा बदला घेण्यास परत येईल अशी शंका त्यांना होती. त्यांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून “सला काय निमित्य केला? असा जाब विचारला व तुम्ही शिपाईगिरी केलीत, सेनापतीसारखे वागला नाहीत अशी प्रतापरावांची निर्भर्त्सना केली. या जाबाने प्रतापराव मनातून दुखावले गेले आणि यानंतरच नेसरी खिंडीत प्रतापराव यांचे बलीदान नाट्य घडले. याशिवाय उमराणी गावास असलेला इतिहास म्हणजे जत संस्थानाचे राजे डफळे सरदार यांचा इतिहास. डफळापूरचे पाटील सटवाजी चव्हाण यांनी १६८० च्या सुमारास आदिलशाहीकडून जत, करजगी, बार्डोल आणि कणद यांची देशमुखी मिळवल्यावर डफळे राजघराणे व जत संस्थान उदयाला आले. संभाजीराजांच्या मृत्युनंतर सटवाजीराजे यांनी धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांच्या बरोबरीने आपल्या १६००० सैन्यासह मुघल सेनेवर हल्ला केला. पेशवाईत आऊसाहेब डफळे (१७०१–५४) यांनी पेशव्यांची अधिसत्ता मान्य करत संस्थानाचे स्वतंत्र कायम ठेवले. दुसऱ्या बाजीरावाने काही काळ देशमुखी जप्त करून त्रिंबकजी डेंगळेकडे या संस्थानचा कारभार सोपविला होता. १८२० मध्ये इंग्रजांनी तह करून सातारच्या छत्रपतींची अधिसत्ता मान्य करविली. त्यानुसार १८४६ नंतर ३ वर्षे राजा अल्पवयीन असल्याने कारभार छत्रपतींचाच होता. सातारा खालसा झाल्यावर (१८४८) संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक बनले. उमराणी गाव सांगली शहरापासुन ८३ कि.मी.वर असुन जत या तालुक्याच्या शहरापासून २० कि.मी. अंतरावर आहे. जत संस्थाना अंतर्गत उमराणी हे एक महत्वाचे ठिकाण असल्याने डफळे घराण्याचे येथे अनेकदा वास्तव्य असे. उमराणी गावात आजही राजे डफळे यांची गढी असुन त्यांचे वंशज तेथे वास्तव्य करून आहेत. सटवाजीराजे चव्हाण यांच्या नंतरच्या काळात हि गढी बांधली गेली असावी. साधारण अर्धा एकर परिसरात पसरलेली हि गढी चौकोनी आकाराची असुन गढीच्या चार टोकाला चार बुरुज आहेत. सध्या या गढीचा वापर डफळे यांचे वंशज करत असुन त्यांनी या गढीला तिच्या मूळ स्वरुपात कायम ठेवले आहे. गढीबाहेर दरवाजा शेजारी आपल्याला गजलक्ष्मी शिल्प पहायला मिळते. गढीची तटबंदी काही प्रमाणात ढासळली असुन या गढीच्या चार टोकाला असलेले चार बुरुज व गढीचा दरवाजा आजही पहायला मिळतो. गढीच्या आवारात दगडात बांधलेली खोल विहीर असुन डफळे यांचा चौसोपी वाडा आहे. गढीतील या वाड्याचे बांधकाम आजही मूळ स्थितीत बांधकामातील लाकडावर अतिशय सुंदर कोरीवकाम केले आहे. वाड्यात राजे डफळे यांचे वास्तव्य असल्याने मर्यादित भागात प्रवेश दिला जातो. गावात फेरी मारताना काही प्राचीन मंदिरे पहायला मिळतात. उमराणी गढी व आसपासचा परिसर पहाण्यास दोन तास पुरेसे होतात.
Sunday, September 27, 2020
उमराणी येथील डफळे सरकार यांचा वाडा

Saturday, September 12, 2020
सामुहाहिक विवाहाची मुहूर्तमेढ रोवणारे संगतीर्थ
महाराष्ट्र-कर्नाटकतल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. धानम्मादेवीच्या विवाहस्थळाला म्हणजेच संगतीर्थ(वळसंग) या धार्मिक स्थळाला श्रावण मासात भाविक मोठ्या संख्येने भेट देऊन तृप्त होतात.जतसारख्या दुष्काळ ओसाड भागात काहीशा दरित वसलेले हे निसर्गरम्य तीर्थक्षेत्र म्हणजे वाळवंटातले ओअॅसिस म्हटले पाहिजे. श्रावणात भाविकांबरोबरच शाळांच्या सहलीदेखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात.
सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी जत तालुक्यातले श्रीक्षेत्र गुड्डापूर येथील धानम्मादेवीचे मंदिर म्हणजे एक जागरूक देवस्थान मानले जाते. महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातले लाखो भाविक मोठ्या संख्येने इथे येत असतात. गुड्डापूरला भेट देण्याआधी भाविक संगतीर्थला आवश्य भेट देतात.वळसंग गावापासून सोरडी मार्गावर अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर संगतीर्थ आहे. धानम्मा हिचा जन्म उमराणी गावचा असला तरी संगतीर्थ इथे तिने 21 दिवस तपश्चर्या केली. हा काळ बाराव्या शतकातला असून ज्या वडाच्या झाडाखाली धानम्माने तपश्चर्या केली, ते झाड आजही इथे दिमाखात उभे आहे. त्याच्या थंडगार सावलीखाली विसावा घेणार्या भाविकांना एक प्रकारे धार्मिक समाधान मिळते.
धानम्माच्या तपश्चर्येमुळे भाविक तिच्या दर्शनाला येत राहिले. मात्र या वाळवंट परिसरात पाण्याचा थेंबदेखील नव्हता. लोकांच्या सांगण्यावरून धानम्माने इथे शंख फुंकला आणि इथे गंगा अवतरली, अशी अख्यायिका आहे.त्यामुळे या ठिकाणाला संखतीर्थ म्हटले जात होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन संगतीर्थ असे नाव या क्षेत्राला पडले. या मंदिराचा पायथ्याशी जिवंत झरा असून बारमाही या ठिकाणी पाणी असते. त्यामुळे या परिसरातल्या लोकांना , भाविकांना पाण्याची टंचाई कधी भासली नाही. इथले पाणी प्यायला गोड, मधुर आहे. भाविक पिण्याच्या बाटल्या भरून तीर्थ म्हणून घरी घेऊन जातात.
धानम्मा पुढे कुडलसंगम(कर्नाटक) इथे गेली. तिथेही तिने तपश्चर्या केली. पुढे कुडलसंगमचा सोमेश्वर आणि धानम्मा यांचा विवाह संगतीर्थ इथे झाला. या ठिकाणी 501 जोडप्यांचा सामुदायिक विवाह पार पडला. त्यात सोमेश्वर आणि धानम्मा यांचाही समावेश होता. ही सामुदायिक विवाहाची मुहूर्तमेढ होती. त्यानंतर इथे सामुदायिक विवाह होऊ लागले. आजही इथे विवाह होतात. श्रावणात दरवर्षी तिसर्या सोमवारी इथे अक्षता पडतात. भाविक धानम्माचा विवाह उत्सव साजरा करतात. या ठिकाणी वडाच्या पारंब्यातून निर्माण झालेल्या खोडाला श्री गणेशाची स्वयंभू प्रतिमा तयार झाल्याचे आपल्याला दिसते.
हा परिसर निसर्गरम्य असा असून वळसंगच्या श्री. धानम्मा ट्रस्टने भाविकांच्या निवासासाठीही अनेक सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. बारा महिने याठिकाणी अन्नछत्र (दासोह) उघडण्यात आले आहे. भाविक मोठ्या भक्तीभावाने त्याचा प्रसाद म्हणून आस्वाद घेतात. पावसाळ्यातली किंवा श्रावणातील सहकुटुंब छोटी सहल म्हणून या तीर्थक्षेत्राला भेट द्यायला काहीच हरकत नाही. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
Monday, July 6, 2020
जालिहाळ बुद्रुकची स्मार्ट व्हिलेजच्या दिशेने वाटचाल
Monday, June 15, 2020
विद्यावाचस्पती भीमराव कुलकर्णी
विद्यानगरीत अव्वल दर्जाचे व्यासंगी प्राध्यापक असा
लौकीक प्राप्त केला आणि वा. ल. कुलकर्णी, गो.
म. कुलकर्णी अशा दिग्गज समीक्षकांच्या पंक्तीत आपलेही मानाचे पान निर्माण केले. आणि हे जे सारे त्यांनी केले ते केवळ स्वबळावर साध्य केले म्हणून त्यांचे आजही अप्रूप वाटते. विद्यावाचस्पती भीमराव कुलकर्णी यांच्या अकाली निधनाचा त्यावेळी मराठी समीक्षा क्षेत्रावर मोठाच आघात झाला होता.
दुष्काळी भागाचा आधार दोड्डनाला तलाव
मांसासाठी प्रसिध्द माडग्याळी मेंढी
Saturday, June 6, 2020
जत परिसरातील रूढी,परंपरा
जतपासून अवघ्या 10-11 किलोमीटर अंतरावर असणारं बनाळी गाव. 40 एकर जमिनीवरील झाडीत हे गाव वसलेलं आहे. हे बनशंकरी देवीचं जागृत देवस्थान. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे गावात मांसाहार करणारा कोणी शोधूनही सापडत नाही. कारण कोणी मांसाहार केलेला येथील देवीला चालत नाही. जर तो कोणी केला तर त्याच्यावर येथील मधमाशा हल्ला चढवितात,असं सांगितलं जातं. गावात जाणारा पाहुणा असला तरी तो यातून सुटत नाही. अशा अनेक घटना गावात घडल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे भितीपोटी गावात कुणीही मांसाहार करत नाही. शिवाय मांसाहार करून कोणी गावाच्या शिवारात पाऊल ठेवत नाही. शिवाय गावात होणारा नवरात्र उत्सव खूप मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. नवरात्रीच्या पहिल्या तीन दिवसात गावातील लोक कडकडीत उपवास करतात या दिवसात हे लोक साधं पाणीही पीत नाहीत.