जत तालुक्याच्या साहित्य क्षेत्रास फार मोठी परंपरा नाही. ज्या मोजक्याच साहित्यीकांनी लेखक केले, त्यांनी आपल्या नावाचा सुस्पष्ट ठसा उमटविला आहे. त्यापैकी एक आहेत, मच्छिंद्र गोरखनाथ ऐनापुरे. प्राथमिक शिक्षक, अभ्यासू पत्रकार व साहित्यीक म्हणून त्यांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या साहित्याचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. जत तालुक्यातील ते असे एकमेव साहित्यिक आहेत, ज्यांची पाठ्यपुस्तक मंडळाने घेतली आहे. बालकथा, विनोदी कथा, व्यक्तीचित्रे व वृत्तपत्र लेख असे त्यांनी विपुल लेखन केले आहे.
Sunday, May 31, 2020
बिळूरचे अतिप्राचीन काशी काळभैरव मंदिर
जत तालुक्यातील बिळूर येथील काशी काळभैरव मंदिरास अनेक वर्षांचा इतिहास आहे. माघ पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते. राज्यासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या बिळुरचा काळभैरव हा भक्तांच्या हाकेला धावुन जातो. 'हरभंडी' या थरारक शर्यतीमुळे या मंदिराची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील काळ्या कुळकुळीत पाषाणातील चमकदार नंदी व आतील शिवलिंग सुमारे ७०० ते ८०० वर्षापूर्वीचे असल्याचे सांगण्यात येते. कलचुरी व यादव राज्याच्या काळात जी मंदिरे बांधण्यात आल्याची आढळतात. त्यातील हे एक अतिप्राचीन मंदिर आहे. सध्या हे जुने मंदिर पाडून त्याठिकाणी कोट्यवधी रूपयाचे नवे नियोजीत मंदिर बांधण्यात येत आहे.
दुष्काळातलं नंदनवन बनाळीची बनशंकरी
पूर्वी होती सुंदर वनराई
तिथे प्रकटली शाकंभरी आई!
महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या बनाळीच्या श्री बनशंकरी देवीचे मूळपीठ कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील बदामीजवळ चोलचगुड येथे आहे. देवीचे उपपीठ जत तालुक्यातील बनाळी येथे आहे. बनाळीतील हे मंदिर हेमाडपंथी असून हे मंदिर रामदेवराव यादव यांच्या कालखंडातील आहे. बनात वसलेले हे मंदिर अतिशय रमणीय ठिकाणी असून याठिकाणी गेल्यानंतर मन प्रसन्न होते.
तिथे प्रकटली शाकंभरी आई!
महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या बनाळीच्या श्री बनशंकरी देवीचे मूळपीठ कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील बदामीजवळ चोलचगुड येथे आहे. देवीचे उपपीठ जत तालुक्यातील बनाळी येथे आहे. बनाळीतील हे मंदिर हेमाडपंथी असून हे मंदिर रामदेवराव यादव यांच्या कालखंडातील आहे. बनात वसलेले हे मंदिर अतिशय रमणीय ठिकाणी असून याठिकाणी गेल्यानंतर मन प्रसन्न होते.
Saturday, May 30, 2020
Friday, May 29, 2020
जत तालुक्यातील गावांच्या नावाचा इतिहास
कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असणाऱ्या जत तालुक्याला प्राचीन आणि ऐतिहासिक मोठा वारसा लाभला आहे. अतिशय जुनी गावे येथे आहेत. आज या तालुक्यात १२० गावे आणि २५० हुन अधिक वाड्यावस्त्या आहेत. या सर्व गावांची नावे आणि त्यांचा इतिहासही वेगळा आहे. सर्वच गावांच्या नावाला इतिहास आहे. प्रत्येक गावाच्या नावाला काही ना काही इतिहास आहे. यातील काही निवडक गावांची नावे आणि इतिहास....
Thursday, May 28, 2020
भाविकांचे श्रद्धास्थान: भाऊसाहेब महाराज उमदीकर
श्री निंबरगी महाराज व श्री भाऊसाहेब महाराज यांचा उल्लेख साक्षात तुकाराम महाराज असा केला जातो. भाऊसाहेब महाराजांची योग्यता मोठी होती. त्यांनी नामाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहचवले. नाम निंबरगी महाराजांनी स्वर्गातून आणले आहे,तेच नाम आपण भक्तांना देत आहोत असे ते सांगत. भाऊसाहेब महाराजांबद्दल भक्ती आहे. त्यांच्या संदर्भात कथा व दृष्टांत दिले जातात.
Wednesday, May 27, 2020
Tuesday, May 26, 2020
स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर सोन्याळ
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा लढा असो अथवा स्वातंत्र्यानंतरचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा किंवा गोवामुक्ती संग्राम असो त्याचबरोबर भूमिहिनांचा सत्याग्रह असो या साऱ्या लढ्यात जत तालुक्यातील सोन्याळ गावचे योगदान मौलिक आणि दखलपात्र आहे. या गावाने विशेषतः काराजनगी कुटुंबीयाने या चळवळीचा महत्वपूर्ण हिस्सा बनून गावाचे नाव इतिहासात कोरले आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात असलेला तालुक्यातील एकमेव राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा साक्ष देतो आहे.
Monday, May 25, 2020
जत शहरातील मंदिरे
जत शहराला मोठी धार्मिक परंपरा लाभलेली आहे. संस्थान काळापासून आजतागायत जतची यल्लम्मा यात्रा भरते. डोंगरावरील अंबाबाईचे मंदिर भक्तांचे लक्ष वेधून घेते तर जत शहराच्या मध्यभागी असलेला जतच्या चिनगीबाबांचा दर्गा व त्यांच्या बाजूला असलेले १०० वर्षापूर्वीचे राम मंदिरात आजही भाविकांनी फुललेले असते. भीमाने स्थापन केलेले बकेश्वर मंदिर हे जतच्या वैभवात भरच घालत आहे.
Friday, May 22, 2020
उमराणी गावाचा वैभवशाली इतिहास
उमराणीचे डफळे म्हणजे जतच्या डफळे राजघराण्यांची एक स्वतंत्र गादी आहे. डफळे घराण्याचे संस्थापक महापराक्रमी श्रीमंत सटवाजीराजे यांच्या मृत्यूपूर्वीच त्यांचे पुत्र बाबाजीराजे व खानाजीराजे यांचे निधन झाले होते. श्रीमंत सटवाजीराजे यांच्या सूनबाई राणी येसूबाई यांनी 1706 ते 1738 सालापर्यंत डफळे संस्थानचा एकसूत्री राज्य कारभार सांभाळला.
Thursday, May 21, 2020
भक्तांच्या हाकेला धावून येणारी जतची यल्लम्मादेवी
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेली जत येथील श्री यल्लम्मा देवी ही नवसाला पावणारी, भक्ताच्या हाकेला ओ देणारी म्हणून सर्वदूर प्रसिध्द आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री यल्लम्मा देवीची यात्रा संस्थानपूर्व काळापासून जतच्या दक्षिणेस दीड किलोमीटरवर असलेल्या गंधर्व नदीच्या काठावर भरते. लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री यल्लम्मा देवीच्या महात्म्याविषययी भक्तांच्या हाकेला धावून आख्यायिका प्रसिध्द आहे.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक श्री बुवानंद
ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. तालुक्यातील सर्वच बाबतीत प्रगत गाव म्हणून त्याची ख्याती आहे. जत संस्थानमधील उपराजधानी म्हणून गावाला ओळखले जाते. डफळापूरचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या गावात आजही हिंदू-मुस्लिम ऐक्य कायम आहे. दोन्ही समाजाचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. श्री बुवानंद हे मूळचे आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथील सुफी संत होते. धर्मप्रचार प्रसार करण्यासाठी निघालेले श्री बुवानंद हे मजल दरमजल करीत जत तालुक्यातील खलाटी येथील डोंगरावर आले.
भक्ती आणि शक्तीपीठ श्री बिसल सिद्धेश्वर
जत-येळवी रस्त्यावर निर्जन स्थळी योगेश्वर श्री बिसल सिध्देश्वर यांचे असलेले समाधीस्थळ जागृत देवस्थान म्हणून सर्वदूर ओळखले जाते. जतसह कर्नाटकातील भाविकांचे शक्तीपीठ, भक्तीपीठ म्हणून उदयास येत आहे. श्री बिसल सिध्देश्वरांचे जीवन चरित्र ९०० वर्षापूर्वीचे असल्याचे मानले जाते. श्री बिसल सिध्देश्वर जतच्या या भुमीत आले कसे? यांची आख्यायिका प्रसिध्द आहे. जतचा हा भाग पूर्वी मिरवाड नावाने ओळखला जात होता. सुंदरतेने नटलेल्या या गावावर नंदेआप्पा गौंड यांचे राज्य होते. राजा नंदेआप्पा गौंड व महाराणी गंगादेवी यांना अनेक वर्षापासून पुत्ररत्न नसल्याने जोडपे दु:खी होते. अनेक वर्षानंतर महालिंगरायाच्या रूपाने राजा नंदेआप्पा व महाराणी गंगादेवी यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. पण महालिंगरायाला महारोग झाल्याने ते चिंतेत होते.
Wednesday, May 20, 2020
पवित्र क्षेत्र संगतीर्थ
श्री क्षेत्र गुड्डापूरपासून सात किलोमीटरवर असलेले तालुक्यातील संगतीर्थ हे पवित्र तीर्थस्थान आहे. हे स्थान श्री दानाम्मा व श्री सोमनाथ यांचा विवाह झालेले स्थळ म्हणून ओळखले जाते. हे संस्मरणीय तीर्थस्थान ठिकाण वळसंग ते सोरडी मार्गावर आहे. मानवाच्या कल्याणार्थ बाराव्या शतकात प्रत्यक्ष शिवपार्वतीने मानव स्वरूपात जन्म घेतला व विधी विधानानुसार प्रत्यक्ष शिवपार्वतीच्या म्हणजे सोमनाथ–दानम्माचा लग्नसोहळा येथे झाल्याची आख्यायिका आहे. श्री दानम्माचा जन्म कुंडलसंगम येथे झाला. सोमनाथांबरोबर त्यांचा विवाह निश्चित झाला.
Tuesday, May 19, 2020
महाभारत कालीन मुचंडीचा श्री दरेश्वर
मुचंडी येथील श्री दरेश्वराचे मंदिर प्रसिध्द आहे.
महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातील भाविक याठिकाणी मोठ्या संख्येने येतात. श्री दरेश्वर देवामुळेच मुचंडी गावास महाभारतकालिन पौराणिक इतिहासही असल्याचे सांगितले जाते. पूर्वी येथे मुचकंदेश्वर ऋषींचा आश्रम होता. त्यामुळे या गावास मुचंडी असे नाव पडल्याचे सांगितले जाते. जत तालुक्यात मुचंडी येथील श्री दरेश्वराचे मंदिर प्रसिध्द आहे. महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातील भाविक याठिकाणी मोठ्या संख्येने दर्शनास येतात. श्री दरेश्वर देवामुळेच मुचंडी गावास महाभारतकालिन पौराणिक इतिहासही असल्याचे सांगितले जाते. पुर्वी येथे मुचकंदेश्वर ऋषींचा आश्रम होता त्यामुळे यागावास मुचंडी असे नाव पडल्याचे सांगितले जाते.
जत जवळील किल्ला:रामदुर्ग
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात अनेक गड , किल्ले, गढ्या बांधलेल्या आहेत. त्यातील काही छोटे किल्ले आणि गढ्या स्थानिक मातब्बर सरदारानी बांधलेल्या आहेत. स्वसंरक्षणा बरोबर प्रशासकीय कारभारासाठी छोटे किल्ले बांधले जात. अशाच प्रकारचा एक छोटेखानी गढी वजा किल्ला "रामदुर्ग" विजापूरचे सरदार डफळे यानी सतराव्या शतकात सांगली जिल्ह्यातील रामपुर या गावातील छोट्याश्या टेकडीवर बांधला. किल्ल्याचा आकार, संरक्षणाच्या सोई आणि पाण्याची व्यवस्था पाहाता हा किल्ला प्रशासकीय व्यवस्थेसाठी बांधला असावा असे म्हणता येइल.
जतचा पहिला क्रांतीकारक- वीर सिंदूर लक्ष्मण
भारत स्वतंत्र व्हावा यासाठी देशभरातील लाखो देशभक्तांनी आपल्या जिवाचे रान केले. अनेकांनी निधडया छातीने इंग्रजाच्या गोळया छातीवर झेलल्या, जन्मठेपेची शिक्षा भोगली. जुलमी इंग्रजांच्या ताब्यातून देश स्वतंत्र व्हावा यासाठी हजारो ज्ञातअज्ञात देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. जतसारख्या दुष्काळी व मागासलेल्या भागातही स्वातंत्र्याच्या क्रांतीचे वारे जोरात वाहू लागले होते. याच काळात जत तालुक्यातील सिंदूर येथील लक्ष्मण नामक युवकांने क्रांतीचा झेंडा हाती घेतला व सारे रान, पेटविले. भीम ताकतीच्या या युवकाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.
Monday, May 18, 2020
सरसेनापती प्रतापराव गुजर
स्वामिनिष्ठा, पराक्रमाच्या बळावर आदिलशाहच्या साम्राज्याला सतत हादरा देणाऱ्या सरसेनापती प्रतापराव गुजर या विराने आदिलशाहच्या 12 हजार सैन्यांना उमराणीत धूळ चारली. एवढेच नव्हे तर त्यांना शरण येण्यास भाग पाडले. जगात कुठेही झाली नसेल अशी सात सैनिक विरुद्ध 12 हजार सैन्यांची लढाई मराठयांच्या इतिहासात झाली. या लढाईची सुरुवात जत तालुक्यातील उमराणी येथे झाली. तर शेवट कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी येथे सहा जून 1674 रोजी झाला.
Saturday, May 16, 2020
प्राचीन आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेला जत तालुका
जत तालुक्याला प्राचीन काळापासूनचा इतिहास आहे. अगदी चालुक्य घराण्यापासूनच्या राजांच्या अनेक पाऊलखुणा तालुक्याच्या अंगाखाद्यावर आजही दिमाखाने मिरवीत आहेत.सांगली जिल्ह्यात अनेक संस्थानिक हो ऊन गेले. सांगली, मिरज व तासगाव येथील पटवर्धन घराण्याबरोबरच जतच्या डफळे घराण्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या संस्थानिकांच्या अनेक महत्त्वाच्या वास्तू आजही आपणास पाहावयास मिळतात.
ऐतिहासिक डफळापूर
जत तालुका आदिलशाहीचा एक भाग होता. त्या काळात डफळापूर हे प्रगत व ऐतिहासिक व वीरांचे गाव म्हणून ओळखले जात होते. गावाला 1200 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. डफळापूर संस्थान काळात उपराजधानी म्हणून ओळखले जात होते. पूर्वी येथील कापूर ओढ्यावर दवनापूर म्हणून उल्लेख आढळतो. डफळापुरातील चव्हाण (चौहान) हे मूळचे राजस्थान भागातील असून युद्ध करत करत येत ते डफळापुरात येऊन स्थिरावले.
Subscribe to:
Posts (Atom)